एक्स्प्लोर
तब्बल 9 वर्षानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहित जेलबाहेर!
तब्बल 9 वर्ष जेलमध्ये असलेले लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांची आज अखेर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तळोजा जेलमधून बाहेर पडल्यानंतर ते थेट आपल्या युनिटला रिपोर्ट करण्यासाठी रवाना झाले आहेत.
फोटो सौजन्य : एएनआय
मुंबई : 2008 मालेगाव स्फोटाप्रकरणी गेली 9 वर्ष तुरुंगात असलेले लेफ्टनंट कर्नल पुरोहित अखेर आज जेलबाहेर आले आहेत. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. पुरोहित आता मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत.
मुंबई सत्र न्यायालयातून काल (मंगळवारी) कर्नल पुरोहित तळोजा जेलमध्ये परतले होते. त्यानंतर तुरुंग प्रशासनाच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर पुरोहित आज जेलबाहेर आले.
तुरुंगाबाहेर आल्यानंतर पुरोहित हे लष्कराच्या टीमसोबत रवाना झाले आहेत. त्यांना घेण्यासाठी लष्कराचे काही जवान आधीपासूनच तुरुंगाबाहेर तैनात होते. पुरोहित आता कुलाब्यातील नेव्हीनगरमध्ये आपल्या युनिटला रिपोर्ट करण्यासाठी या टीमसोबत रवाना झाले आहेत.
पुरोहित लष्कराच्या युनिटला रिपोर्ट करणार
लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, 20 जानेवारी 2009 रोजी अटक झाल्यानंतर पुरोहितचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते सैन्याच्या मध्य प्रदेशातील पचमढीमधील युनिटमध्ये कार्यरत होते. निलंबित अधिकारी किंवा जवानाला जामीन मिळाल्यानंतर त्याला 24 तासात आपल्या युनिटला रिपोर्ट करावं लागतं. सर्व बाबी लक्षात घेऊन सैन्य संबंधित अधिकारी/जवानाच्या निलंबनावर विचारविनिमय करतं. यादरम्यान त्याला ‘ओपन अरेस्ट’ म्हणजे खुल्या अटकेत ठेवलं जातं. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जातं. त्याला लष्करी गणवेश परिधान करणं आवश्यक असतं, पण विशेष परवानगीत तो साधे कपडेही परिधान करु शकतो.
मालेगाव बॉम्बस्फोट
2008 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता तर 80 जण जखमी झाले होते. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावत एका बाईकमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडवण्यात आला होता. यानंतर स्फोटासाठी आरडीएक्स पुरवणं आणि कट रटल्याच्या आरोपाखाली साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
तळोजा जेलमधून कर्नल पुरोहितांची उद्या सुटका होणार
ले. कर्नल पुरोहित पुन्हा मुंबई हेडक्वार्टरमध्ये ड्युटी जॉईन करणार?
2008 मालेगाव स्फोट : कर्नल पुरोहितला अखेर जामीन
मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी काय?
लेफ्टनंट कर्नल पुरोहित आज तुरुंगाबाहेर येणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement