(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lokal Train : मोटरमनच्या मृत्यूचा मध्यरेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम; 80 पेक्षा जास्त लोकल गाड्या रद्द करण्याची वेळ
Lokal Train : मोटरमनच्या मृत्यूचा मध्यरेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झालाय. रेल्वे प्रशासनावर अनेक लोकल रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुंबईतील (Mumbai Lokal) अनेक प्रवाशांचे हाल झालेले पाहायला मिळाले. प्रवाशी तासंतास रेल्वे स्टेशनवर उभे असलेले पाहायला मिळाले.
Lokal Train : मोटरमनच्या मृत्यूचा मध्यरेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झालाय. रेल्वे प्रशासनावर 80 पेक्षा जास्त लोकल रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुंबईतील (Mumbai Lokal) अनेक प्रवाशांचे हाल झालेले पाहायला मिळाले. प्रवाशी तासंतास रेल्वे स्टेशनवर उभे असलेले पाहायला मिळाले. मोटरमन मुरलीधर शर्मा (Murlidhar Sharma) यांनी केलेल्या आत्महत्येनंतर हा प्रकार घडलाय.
काय आहे प्रकरण ?
मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी शुक्रवारी (दि.10) प्रगती एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, कुटुंबातील सदस्यांना येण्यास विलंब झाल्याने मोटरमनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सायंकाळ झाली. त्यात मोटरमनने आत्महत्या केल्याने इतर कर्मचारी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले. त्यामुळे कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय कमी झाली. याचा परिणा असा झाली की, अनेक लोकल गाड्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे शनिवारी मुंबईतील अनेक प्रवाशाचे हाल झाले आहेत.
रेल्वेकडून काय माहिती देण्यात आली?
रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकल ट्रेनच्या मोटरमनचा शुक्रवारी मृत्यू झाला. मोटरमनच्या मृतदेहावर आज दि. 10 दुपारी अंत्य संस्कार पार पडणार होते. मात्र, मोटरमनच्या कुटुंबातील सदस्य पोहोचल्यानंतर सायंकाळी 5 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी इतर मोटरमन मोठ्या उपस्थित होते. त्यामुळे ते आज कामावर हजर राहू शकले नाहीत. याचा परिणाम असा झाला की, सायंकाळच्या वेळेत एकूण 88 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या. ट्रेन अचानक रद्द करण्यात आल्याने अचानक अनेक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत होती. गर्दीमुळे अनेक प्रवाशांना 5-5 ट्रेन सोडून द्याव्या लागल्या. दरम्यान रात्र, 10 नंतर लोकल ट्रेन्सची संख्या वाढली आणि अनेक स्टेशनवरिल गर्दी कमी झाली.
लोकल गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल
मुंबईत शनिवारी (दि.10) लोकल ट्रेनला स्टेशनवर पोहोचण्यासाठी विलंब लागत असल्याने प्रवासी चांगलेच हैराण झाल होते. अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवर तासंतास थाबले होते. मात्र, लोकलमध्ये एवढी गर्दी होती की, ते व्यवस्थितपणे ट्रेनमध्ये जाऊही शकत नव्हते. दरम्यान काही प्रवाशांनी जीव धोक्यात घालूनही प्रवास केलाय. रेल्वेकडून याबाबत कोणतीही माहिती दिली जात नव्हती, असा आरोप प्रवासी करत आहेत. दरम्यान रेल्वेकडून संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या