TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP Majha
डोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली, एमआयडीसीमधील एमआयडीसी फेज-२मधील कंपनीत ब्लास्ट, डोंबिवलीत दुर्घटनेत सात मृत्यू
डोंबिवलीतील एमआयडीसीमधील स्फोटाने परिसर हादरला, अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, तर परिसरात धुराचे लोळ, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न
बिघडलेली कार चालवायची परवानगी अगरवालने मुलाला दिलीच कशी? चालकाच्या कथित जबाबावर सवाल उपस्थित
दोन निष्पापांचा जीव घेतल्यानंतर विशाल अगरवालचे नक्राश्रू, मुलाला गाडी देऊन चूक केल्याची पोलिसांसमोर कबुली तर सुरेंद्र अगरवाल यांची पुणे गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु
अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना ५० हजारांचा दंड, टीकेची झोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्यातील पाणीटंचाईचा आढावा, टँकर आणि जनावरांच्या चाऱ्यांची सोय करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती.
दुष्काळसदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी निवडणूक आयोग आचारसंहितेतून सूट देण्याची दाट शक्यता, केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवसात निर्णय घेणार
अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू, दोघे बचावले तर एकाचा शोध सुरु, बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेताना दुर्घटना