![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024
Ujani Dam Accident : उजनी धरण (Ujani Dam) जलाशयात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. धरणात बोट बुडून सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनंतर सोलापूर (Solapur) जिल्हा हादरुन गेला आहे. दरम्यान, या घटनेत एका संपूर्ण कुटुंबालाच जलसमाधी मिळाली आहे. करमाळा तालुक्यातील झरे गातवातील कुटुंबाचा या घटनेत मृत्यू झालाय. पती पत्नीसह दोन चिमुरड्याचा या घटनेत अंत झालाय. दरम्यान या घटनेनंतर गावावर शोककळा पसरलीय. या घटनेनंतर अख्ख्या झरे (Zare) गावात चूल पेटली नाही. या घटनेनंतर सर्वांनाच आक्रोश आणि हुंदका दाटून आलाय.
बोट दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू
बोट दुर्घटनेची माहिती मिळतात झरे गाव आणि परिसरावर शोककळा पसरलीय. करमाळा तालुक्यातील झरे गावातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी झरे गावातील एकाच कुटुंबातील मृतांची नावे आहेत. या घटनेतून पोलीस अधिकारी राहुल डोंगरे हे वाचले आहेत. ते पोहत किनारी आल्यामुळं त्यांचा जीव वाचला आहे. तसेच अनुराग अवघडे व गौरव धनंजय डोंगरे रा. कुगाव या सर्वांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
गोकुळ यांच्या जाण्यानं घरातील कर्ता पुरुष हरपला
दरम्यान, या बोट दुर्घटनेबाबत एबीपी माझाने झरे गावातील काही ग्रामस्थांनी संवाद साधला. यावेळी ग्रमास्थांनी गोकूळ जाधव यांच्याबाबतची, तसेच या घटनेबाबतची माहिती दिली. मृत गोकूळ जाधव यांचे कुटुंब अगदी गरीब होते. प्लंबिगचा काम करुन तो कुटुंब चावलत होता. गोकूळला एका भाऊ आहे, पण तो नोकरीनिमित्त बाहेर असतो. आई वडील वयस्कर झाले आहेत. त्यामुळं गोकुळ हाच घरातील कर्ता पुरुष होता. आता गोकूळच्या जाण्यानं कुटुंबाटं फार मोठं नुकसान झाल्याचे माहिती गावातील ग्रामस्थ नाना घाटगे यांनी दिली आहे.
दोन दिवसापासून गावात चुल पेटली नाही
या दुर्घटनेमुळं संपूर्ण झरे गाव हैराण झालं आहे. गेल्या दोन दिवसापासून गावात चुल पेटली नाही. सर्व ग्रामस्थ उपाशी असल्याची माहिती नाना घाटगे यांनी दिली आहे. असा दुर्दैवी प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ नये असे घाटगे म्हणाले. दरम्यान, गोकूळ आणि त्यांच्या पत्नीलाही पोहता येत होते. मात्र, वाऱ्यामुळं पाण्याचा भोवरा झाल्याची शक्यता असेल. त्यामुळेचं त्यांना पोहून बाहेर निघता आले नसल्याची माहिती नाना घाटगे यांनी दिली.
![Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/303be3d31d616c7b0fc064bec2b715a21718539527132977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/40e930be66942bc9f5c3f5cedf2eecfb1718538838915977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 05 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/a0f90fed29ceeb79c536647ea1f0c7141718538603645977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Praful Patel : मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/671703c2ebb40deced5ecf375ff9a8801718537680232977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PM](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/2cb7840033c9a71f503501ac89626e411718537144168977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)