एक्स्प्लोर

श्रमिक ट्रेनमध्ये प्रवेश मिळेल या आशेवर घरदार सोडून आलेल्या स्थलांतरीत मजुरांची दुरावस्था

शकडो लोक स्टेशनबाहेरच्या फूटपाथवर ठाण मांडून बसले आहेत, ज्यांना इथवर आणण्यात आलं खरं मात्र काही कारणाने त्यांना स्टेशनमध्ये प्रवेशच मिळू शकला नाही. यातील बरेचसे लोक मंगळपासून इथेच थांबून आहेत.

मुबंई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर बुधवारीही स्थलांतरित मजुरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सीएसएमटीहून परराज्यांसाठी सुटणाऱ्या विशेष श्रमिक गाड्यांचा सिलसिला बुधवारी कायम होता. बेस्ट, एसटी, खाजगी बसेसमध्ये भरून राज्यातील परराज्यात जाणाऱ्या मजुरांना रेल्वे स्टेशनपर्यंत आणण्यात येत आहे. सीएसएमटी जंक्शनहून ईस्टर्न एक्स्प्रेसवेकडे जाणारा रस्ता यासाठी पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद करून टाकला आहे.

ज्यांची नावं यादीत आहेत त्यांना पार्किंगच्या मुख्य प्रवेशद्वारावर सॅनिटाईज करून स्टेशनच्या आवारात प्रवेश दिला जात आहे. मात्र असे शकडो लोक स्टेशनबाहेरच्या फूटपाथवर ठाण मांडून बसले आहेत, ज्यांना इथवर आणण्यात आलं खरं मात्र काही कारणाने त्यांना स्टेशनमध्ये प्रवेशच मिळू शकला नाही. यातील बरेचसे लोक मंगळपासून इथेच थांबून आहेत. यांना 'तुमची गाडी रद्द झालीय', 'ती आज येणार नाही तेव्हा तुम्ही नंतर या' अशी कारण दिली गेली आहेत.

पोलीस कर्मचारी यांना पुन्हा घरी परतण्याची सूचना देत आहेत. पण दोन अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आपल्या मूळगावी, आपल्या घरी आपण परतणार या आशेनं यातील बरेचसे लोक आपला सारा गोतावळा गुंडाळून आलेत. आता इतक्यात परत मुंबईत परतायचं नाही, या उद्देशानं आपली भाड्याची खोली, झोपडी खाली करून हे लोकं स्टेशनवर दाखल झालेत. त्यामुळे आता ते मागे परतू शकत नाहीत. केवळ घराकडे जाणाऱ्या गाडीत बसणं किंवा आहेत त्या फुटपाथवर आपल्या कुटुंबासह बसून वाट पाहात बसणं, एवढंच त्यांच्या हातात आहे. त्यांच्यासमोर इतर पर्यायच शिल्लक नाहीत.

कोलकाता, पश्चिम बंगाल इथं जाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या यापैकी काही मजुरांनी एबीपी माझाशी बोलताना महाराष्ट्र सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममतादीदी यांना साकडं घालत मदतीची याचना केली आहे. तेव्हा यांच्यासारख्या अशा असंख्य मजुरांना त्यांच्या राज्यात, त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवणं ही महाराष्ट्र सरकार आणि इतर राज्य सरकारांसह केंद्र सरकारचीही तितकीच जबाबदारी आहे, अशी भावना या मजुरांनी बोलून दाखवली.

Lockdown 4.0 | वसईच्या सनसिटी मैदानात सलग दुसऱ्या दिवशी मजुरांची गर्दी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kisse Pracharache Seg 02 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 04 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget