एक्स्प्लोर
एका बॅगमुळे हार्बर मार्गावरची लोकल वाहतूक विस्कळीत
सकाळी साडेनऊच्या सुमारास वाशी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर ही घटना घडली. ज्या लोकलवर बॅग पडली ती पनवेलला जाणारी होती.
मुंबई : एका बॅगमुळे हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. वाशी स्टेशवर पेंटाग्राफवर बॅग पडल्याने आग लागली. परिणामी पनवलेला जाणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास वाशी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर ही घटना घडली. ज्या लोकलवर बॅग पडली ती पनवेलला जाणारी होती.
बॅग पेंटाग्राफवर पडल्याने आग लागली आणि प्रचंड धूर येऊ लागला. परिणामी लोकल बंद करण्यात आली. वाशी स्टेशनवर 12 मिनिटं थांबवली होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवून ती लोकल सानपाडा कारशेडला रवाना करण्यात आली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरु झाली. मात्र या लोकलनंतर धावणाऱ्या सर्वच गाड्या रखडल्या आणि 10 ते 15 मिनिटं उशिराने धावू लागल्या.
ही बॅग कोणाची होती, ती कशी पडली की कोणी फेकली याबाबत चौकशी सुरु आहे. मात्र यामुळे हार्बर लाईनवरील सर्वच गाड्या उशिराने धावत आहेत. दरम्यान, वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रवाशांनी बॅग किंवा इतर वस्तू ट्रेनवर फेकू नये, अशी विनंती मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.Pantograph of PL-49 CSMT-Panvel local flashed due to discarded bag thrown by unknown person on pantograph of PL-49 local at Vashi station. Train detained for 12 minutes from 09.28 hrs at Vashi station. Rake withdrawn and sent to Car shed for safety reasons. pic.twitter.com/7h38Ehn7r3
— Central Railway (@Central_Railway) October 9, 2019
Commuters are requested not to throw objects, bags, etc. on trains which may lead to disruption of services. @drmmumbaicr @drmpune pic.twitter.com/sLc2jEc7sB
— Central Railway (@Central_Railway) October 9, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement