एक्स्प्लोर

Mumbai Nightlife | मुंबईतील पहिल्या नाईट लाईफला अल्प प्रतिसाद

मुंबईतील पहिल्या नाईट लाईफला सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्या नाईट लाईफला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. अनेक मॉल, रेस्टॉरंट्स तसंच चौपाट्यांवर नाईट लाईफची तयारी थंडच होती.

मुंबई : मुंबईकरांनो जागते रहो...मुंबईसाठी हा नवा मंत्र 26 जानेवारी 2020 पासून लागू झाला आहे. कारण, आता मुंबईत येणारी प्रत्येक रात्र ही नाईट लाईफची असेल. मुंबईत, नाईट लाईफच्या पहिल्या रात्रीला व्यसायिकांनी दिलेला तसा थंडच म्हणावा लागेल. काही ठिकाणी नाईट लाईफ रात्री तीनपर्यंत सुरु राहिली तर काहींनी पुरेशी तयारी नसल्याने नंतर बघू असा पवित्रा घेतला. त्यामुळे, नाईट लाईफची पहिल्या रात्रीला अजून तरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

नाईट लाईफच्या पहिल्या रात्रीची सुरुवात तर झोकातच झाली, शेवट मात्र म्हणावा तसा झाला नाही. वरळी सी-फेसवर रात्री दहाच्या सुमारासही दिवसभर असते तेवढीच गर्दी होती. मुंबईची नाईट लाईफ अधिकृतरित्या आता सुरु होणार त्यामुळे ही गर्दी जरा जास्तच उत्साहात होती. मुंबई 24 तास जागती ठेवण्याची ही कल्पना ज्यांच्या डोक्यातून आली त्या आदित्य ठाकरेंनीही वरळी-सीफेसच्या वरळी फेस्टिवलला रात्री हजेरी लावली.

तशीही मुंबईला झोपण्याची सवय कमीच. ती कायम जागीच असते आणि या शहराला जागतं ठेवतो तो मुंबईकर. एकीकडे, मुंबईकर नाईट लाईफसाठी उत्सुक असले तरी मात्र, नाईटलाईफ सुरु करण्याची मुख्य ठिकाणं म्हणजे मॉल, रेस्टॉरंट आणि चौपाट्या इथे मात्र नाईट लाईफची तयारी थंडच होती.

Night Life | मुंबईत आज मध्यरात्रीपासून 'नाईट लाईफ'ला सुरुवात

मुंबईतील पहिल्याच नाईट लाईफचा अनुभव निराशाजनक होता. नाईट लाईफ सुरु होणार म्हणून उशिरा शॉपिंग करुन जेवायला गेलो, पण, सगळं बंद झालं होतं, अशी प्रतिक्रिया एका कुटुंबाने दिली. तसंच काही मॉल आणि चौपाटीवर नाईटलाईफ मात्र दिसली नाही. मॉल आणि रेस्टॉरंट्स तर खुले नाहीत. त्यामुळे जर कुठे नाईटलाईफ दिसलीच तर ती रात्री उशिरापर्यंत किटलीतून चहा विकणाऱ्या आणि तो घेणाऱ्यांमध्ये.

नाईटलाईफचे नियम काय? पोलीस, मुंबई महापालिका, उत्पादन शुल्क विभाग, कामगार विभाग, पर्यटन विभाग यांची काय काय जबाबदारी असणार याचे नियम आहेत. नाईट लाईफमध्ये सहभागी मॉल, रेस्टॉरंट यांनी कुठले नियम पाळणे गरजेचे आहे, याची विस्तृत नियमावली महापालिकेने बनवली आहे. रात्री दीड वाजेनंतर दारु बंद असणार आहे. रात्री दीड वाजेपर्यंतच मद्यविक्रीस परवानगी असणार आहे. रात्री दीड वाजेनंतर दारु विकताना आढळल्यास संबंधितांचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द केला जाईल. तसेच तेथील मॉल किंवा मिलला नाईटलाईफ सुरु ठेवण्यास परवानगी नाकारली जाईल. कामगार कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी केली जाईल.

जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, बीकेसी, वरळी सी फेस, वांद्रे बँडस्टँड, नरिमन पॉईंट रोड आणि एनसीपीए कॉर्नर या ठिकाणी फूड ट्रक म्हणजे वाहनावरील उपहारगृह लावण्यास परवानगी दिली जाईल. परंतु एका ठिकाणी पाच फूड ट्रक उभे राहतील, जे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहतील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget