एक्स्प्लोर
स्प्रेची बाटली डोक्यात घालून जावयाकडून सासूची हत्या
सासूला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन खाली फेकले.
ठाणे : पती-पत्नीच्या कौटुंबिक कलहात मद्यपी जावयाने स्प्रेची बाटली डोक्यात मारुन सासूची हत्या केली. त्यानंतर सासूला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन खाली फेकले. घोडबंदर रोडवरील रुमा बाली या उच्चभ्रू संकुलात सोमवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली.
कमलजीत कौर असे मृत सासूचे नाव असून कर्णबधीर विवाहित मुलीला जावयाकडून होणाऱ्या त्रासाबाबत जाब विचारण्यासाठी आली होती. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी जावई अंकुश भट्टी याला अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने अंकुश भट्टी याला 15 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले यांनी दिली.
हिरानंदानी संकुलात राहणारी कमलजीत कौर यांची मुलगी कर्णबधीर असून ती घटस्फोटिता होती. कमलजीत यांनी तिचा विवाह घोडबंदर रोडवरील रुमा बाली या उच्चभ्रू संकुलात पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अंकुश भट्टी याच्याशी करून दिला होता. लग्नात घर, गाडी आणि सासरच्या मंडळीचा ट्रान्सपोर्ट व्यवसायदेखील भट्टी याला दिला होता. तरीही तो मद्याच्या आहारी जाऊन कर्णबधीर मुलीला त्रास देत असल्याने कमलजीत कौर गेली वर्षभर तिला भेटण्यासाठी जात असे.
मुलीने पतीबाबत माहेरी तक्रारी केल्याने याचा जाब विचारण्यासाठी कमलजीत कौर सोमवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास रुमा बाली संकुलात आल्या होत्या. तेव्हा दारुच्या नशेत तर्र असलेल्या भट्टीने सासूलाच शिवीगाळ करीत तिच्या डोक्यात स्प्रेची बाटली मारली. तसेच रक्तबंबाळ अवस्थेतच तिला पकडून थेट बेडरूमच्या खिडकीतून इमारतीखाली फेकून देत तिची हत्या केली.
याप्रकरणी मृत कमलजीतच्या मुलाच्या तक्रारीवरुन कासारवडवली पोलिसांनी भट्टी याला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement