एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Fire | स्वत:चा जीव धोक्यात घालून राष्ट्रध्वज आगीच्या ज्वाळांपासून वाचवणारा शिपाई
मुंबईतल्या जीएसटी भवनाला लागलेली आग 3 तासांनंतर आटोक्यात आली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, शिपाई कुणाल जाधव यांनी आपला जीव धोक्यात घालून तिरंगा सुरक्षित उतरवला.
मुंबई : जीएसटी भवनाच्या आगीत शिपाई कुणाल जाधव यांनी प्रसंगावधान राखत 9 मजल्यावरील तिरंगा सुरक्षित उतरवला आहे. त्यांच्या या कृतीमुळे सर्वजण त्यांचं कौतुक करतायेत. आगीच्या झळा हळुहळू ध्वजापर्यंत पोहचत होत्या. मात्र, जीवाची पर्वा न करता कुणाल यांनी तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवला. देशप्रेमातून ही कृती केल्याचं कुणाल यांनी सांगितलं. मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. दरम्यान, तीन तासांनंतर आग आटोक्यात आली आहे.
याच जीएसटी भवनाच्या नवव्या मजल्यावर तिरंगा फडकत होता. कुणाल जाधव हे गेल्या 16 वर्षांपासून जीएसटी भवनात शिपाई या पदावर कार्यरत आहे. ज्यावेळी आग लागली, त्यावेळी नवव्या मजल्यावरील तिरंग्याला त्याचा धोका असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ कुणाल यांनी प्रसंगावधान राखत नवव्या मजल्यावरील तिरंगा सुरक्षित खाली उतरवला. देशाबद्दल असलेल्या प्रेमातून त्यांनी ही कृती केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या 20 ते 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
मुंबईतील जीएसटी भवनमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी
उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक सोडून घटनास्थळी -
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाय बी सेंटरमधील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सोडून घटनास्थळाला भेट दिली. जीएसटी भवनच्या नव्या इमारतीला ही आग लागली आहे. सुरुवातील मुंबई अग्निशमन दलाला लेव्हव 3 चा म्हणजेच गंभीर स्वरुपाची आगीचा कॉल देण्यात आला होता. परंतु, ही लेव्हल 4 ची आग असल्याचं अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. त्यामुळे अग्निशमन दलाच्या 20 हून जास्त गाड्या, वॉटर टँकर आणि सहा अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत. धूर जास्त असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत. सुमारे 100 जवान आग आटोक्यात आणण्यासाठी कार्यरत आहेत.
महत्त्वाची कागदपत्रे आगीमत जळून खाक झाल्याची भीती -
धूर येत असल्याचं समजताच इमारतीमधील कर्मचारी बाहेर पडल्याची माहिती इथे काम करणारे कर्मचारी सुशांत खोब्रागडे यांनी दिली. आगीत कोणीही अडकले नसल्याचं समोर येत आहे. तसंच इमारतीमधील बहुतांश साहित्य लाकडी असल्याने आग झपाट्याने पसरत आहे. इमारतीमध्ये जीएसटीसंदर्भातील अनेक महत्त्वाची कागदपत्रे आहेत. आगीमध्ये ती जळून खाक झाल्याची भीती वर्तवली जात आहे. स्पार्किंग झाल्याने आग लागल्याचं कळतं.
GST Bhavan Fire | मुंबईत जीएसटी भवनात अग्नितांडव, अग्निशमन दल घटनास्थळी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement