एक्स्प्लोर
नवरा दुर्लक्ष करीत असल्यानं, भाच्याच्या साथीनं सवतीचा खून

कल्याण: कल्याणमधल्या आयशा खान या महिलेच्या हत्येचा उलगडा लावण्यामध्ये पोलिसांना यश आलं आहे. भाच्याच्या मदतीनं सवतीनंच आयशाची हत्या केल्याचं आता समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी रोहिमा खान आणि राणा मलिक या दोघांना अटक केली आहे. तब्बल पाच महिन्याच्या तपासानंतर या हत्येचा उलगडा झाला आहे. आयशाचं करीम खानसोबत काही महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. करीमचं हे दुसरं लग्न असून पहिल्या पत्नीपासून करीमला 3 मुलं आहेत. दुसरं लग्न केल्यानंतर आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या रागातून रोहिमा हिनं आयशाची हत्या केली. हत्येनंतर करीम फरार झाला होता. त्यामुळं पोलिसांचा करीमवर संशय होता. पण चौकशीनंतर रोहिमा आणि तिचा भाचा राणा या दोघांनी आयशाची हत्या केल्याचं समोर आलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















