एक्स्प्लोर
कल्याणमध्ये NIIT क्लासेसमध्ये आग, संपूर्ण मजला जळून खाक
कल्याण : कल्याणमध्ये एनआयआयटी क्लासेसमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत संपूर्ण मजला जळून खाक झाला आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कल्याण पश्चिमेला स्टेशन रोडवर असलेल्या एनआयआयटी क्लासेसमध्ये दुपारच्या सुमारास आग लागली. सुदैवाने रविवारची सुट्टी असल्यामुळे क्लासमध्ये विद्यार्थी नव्हते. आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement