एक्स्प्लोर
कल्याणमध्ये विहिरीत बुडून तीन कामगार, अग्निशमनच्या दोन जवानांचा मृत्यू
विहीर साफ करण्यासाठी उतरलेले कामगार बराच वेळ बाहेर न आल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं होतं.
कल्याण : कल्याणमध्ये विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. केमिकलच्या पाण्यामुळे पाच जणांना प्राण गमवावे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कल्याण पूर्वमधील नेतीवली लोकग्राम परिसरात एक विहीर आहे. विहीर साफ करण्यासाठी तीन कामगार आत उतरले होते. बराच वेळ झाल्यानंतरही ते बाहेर न आल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं.
अग्निशमनचे दोन जवान कामगारांच्या शोधासाठी विहिरीत उतरले, मात्र त्यांचाही बुडून मृत्यू झाला. या विहिरीत केमिकलचं पाणी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फायर ब्रिगेड कर्मचारी असलेले अनंता शेलार, प्रमोद वाघचौरे तर राहुल गोस्वामी, गुणा गोस्वामी या स्थानिक कामगारांचा मृत्यू झाला. पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement