एक्स्प्लोर

Jumbo Mega Block : मध्य रेल्वेच्या जम्बो मेगाब्लॉकचे फलित काय?

Jumbo Mega Block : 2008 साली मंजूर झालेल्या मार्गाचे काम अखेर फेब्रुवारी 2022 मध्ये पूर्णत्वास येईल. त्यासाठीच आज (रविवारी) 18 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Jumbo Mega Block : मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या मागणीनुसार मध्य रेल्वेने आज (रविवारी) दिवा आणि ठाणे या स्थानकांच्या दरम्यान तब्बल 18 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेतला होता. या मेगाब्लॉकमुळे 160 लोकल आणि 18 लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आज ठाणे आणि दिवा स्टेशनच्या दरम्यान धीम्या मार्गिकेवरून एकही लोकल धावली नाही. मात्र इतका मोठा ब्लॉक घेऊन नेमकं काय काम केलं जाते आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर आज कळवा स्टेशनवरून येणाऱ्या धीम्या मार्गिका या नवीन तयार करण्यात आलेल्या मार्गिकांना जोडण्यात आल्या. त्यामुळे सोमवारपासून (20 डिसेंबर) कळवा ते मुंब्रा दरम्यान लोकल गाड्या नवीन मार्गिकेवरून धावतील. तर पुढील 15 दिवस जुन्या मार्गिकेवर काम हाती घेण्यात येईल आणि त्या खाडी किनारी बांधण्यात आलेल्या मार्गिकांना जोडण्यात येतील. 
 
या मेगाब्लॉकनंतर सोमवारपासून लोकलचा मार्ग थोडासा बदलून कळवा आणि मुंब्रा स्थानकात या दरम्यान नवीन मार्गावरून या लोकल चालवल्या जातील. पण हा शेवटचा मेगाब्लॉक नसून येणाऱ्या काळात असे 24 आणि 72 तासांचे दोन ते तीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये ठाणे येथील धिम्या मार्गिका नवीन मालिकांना जोडणे, विटावा येथे जलद मार्गिका नवीन नागरिकांना जोडणे, अशी कामे करण्यात येतील.
 
भविष्यात प्रवाशांना फायदा
 
या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. मात्र यामुळे भविष्यात याच प्रवाशांना फायदा होईल. पाचवी सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान पारसिकच्या बोगद्यातून दिवा मार्गे पुढे जातील. तर ठाण्याहून सुटणाऱ्या जलद लोकल पारसिकच्या बोगद्यातून न जाता नवीन बनवलेल्या मार्गांवरून धावू लागतील. एक्सप्रेस आणि लोकलचे मार्ग वेगवेगळे झाल्यामुळे वेळापत्रकात अधिक लोकल सामावत येतील. याचा फायदा ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत, कसारा अशा ठिकाणी राहणऱ्या प्रवाशांना होईल. सूत्रांच्या माहितीनुसार या नवीन वेळापत्रकात जास्तीत जास्त एसी लोकल असतील.
 
ठाणे ते दिवा या दरम्यान होणारे काम हे कुर्ला ते कल्याण या पाचव्या आणि सहाव्या मालिकेच्या प्रकल्पाचा पहिल्या टप्प्याचे काम आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यांचे काम हाती घेण्यात येईल. एम आर व्ही सी बांधत असलेल्या पाचवी सहावी मार्गिका खऱ्या अर्थाने त्याच वेळी उपयोगी पडेल ज्यावेळी सीएसएमटी ते कल्याण यादरम्यानचे काम पूर्ण होईल. कुर्ला ते कल्याण या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी जर तेरा वर्षे लागली असतील तर कुर्ला ते सायन आणि सायन ते सीएसएमटी या दोन टप्प्याचे काम पूर्ण होण्यास किती वेळ लागेल याचा अंदाज आज कोणीच बांधू शकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
Chembur Accident Report: 'चेंबूरमध्ये झाड कोसळून विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला? मुंबई महापालिकेचा चौकशी अहवालातून कारण समोर; 'Act of God'चा उल्लेख
'चेंबूरमध्ये झाड कोसळून विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला? मुंबई महापालिकेचा चौकशी अहवालातून कारण समोर; 'Act of God'चा उल्लेख
Raj Thackeray On MNS Deepotsav Celebration Shivaji Park: यंदा आम्ही दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला; राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले , मला अजिबात पटत नाही!
यंदा आम्ही दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला; राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले , मला अजिबात पटत नाही!
NCP meeting Sunetra Pawar: निधी मिळाला नाही तर जेवढ्या मतांनी निवडून आलोय, तेवढ्याच मतांनी पडेन! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने सुनेत्रा पवारांना स्पष्टच सांगितलं
निधी मिळाला नाही तर जेवढ्या मतांनी निवडून आलोय, तेवढ्याच मतांनी पडेन! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने सुनेत्रा पवारांना स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती; 500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी, पाटील म्हणाले...
Sahar Shaikh Aurangzeb Controversy : 'इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही': AIMIM च्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात, औरंगजेब जयंतीच्या शुभेच्छा दिल्या अन्...., नेमकं काय आहे प्रकरण?
'इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही': AIMIM च्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात, औरंगजेब जयंतीच्या शुभेच्छा दिल्या अन्...., नेमकं काय आहे प्रकरण?
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत उलथापालथ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारा ढाण्या वाघ कोण?
अमेरिकेच्या निवडणुकीत उलथापालथ; डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारा ढाण्या वाघ कोण?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
Barack Obama US Midterm Elections Result 2026: मोठी बातमी : डोनाल्ड ट्रम्प हरले, बराक ओबामा म्हणाले, ही तर फूट पाडणाऱ्यांना चपराक, अमेरिकेच्या एकीचा विजय
मोठी बातमी : डोनाल्ड ट्रम्प हरले, बराक ओबामा म्हणाले, ही तर फूट पाडणाऱ्यांना चपराक, अमेरिकेच्या एकीचा विजय
Pradeep Purnekar Case Shrikant Shinde on: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात शिवसेनेची इमेज डागाळली, श्रीकांत शिंदेंनी प्रवक्त्यांना नंदनवन बंगल्यावर बोलावून घेतलं, नाराजी व्यक्त करत महत्त्वाचे आदेश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात शिवसेनेची इमेज डागाळली, श्रीकांत शिंदेंनी प्रवक्त्यांना नंदनवन बंगल्यावर बोलावून घेतलं, नाराजी व्यक्त करत महत्त्वाचे आदेश
Gokul Election 2026: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
Embed widget