एक्स्प्लोर

कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्रात संताप, पुण्यात शिवसैनिक घेणार अमित शाह यांची भेट

बंगळूरु येथे घडलेल्या घटनेच्या विरोधात सलग दुसऱ्या दिवशी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात आंदोलक जोरदार घोषणाबाजी देत आहेत.

बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांसह शिवेसना, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात आंदोलक जोरदार घोषणाबाजी देत आहेत. या आंदोलनावेळी काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट देखील झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. तर मुंबईत ठिकठिकाणी शिवसेना रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. तसेच या घटनेबाबत शिवसेनेचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पुण्यात भेट घेणार आहे.

बोम्मई यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
दादरच्या शिवाजी पार्क येथे शिवसेनेकडून या घटनेचा निषेध व्यक्त करत कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यादरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.  यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत चांगलीच झटापट झाली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी आक्रमक झालेल्या शिवसनेच्या कार्यकर्त्यांना शांत केले.

सांगलीत राष्ट्रवादीकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घातला. यावेळी बंगळुरूमधील घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे  नेते आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जोरदार घोषणा देण्यात आल्या. ज्यांनी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केलाय त्यांना शोधून कर्नाटक सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागनी राष्ट्रवादीकडून करण्यात आली.

नागपुरात युवा सेनेचा कर्नाटक सरकारला इशारा
उपराजधानी नागपुरात देखील या घटनेचे पडसाद उमटले आहेत. शहराच्या गांधी गेट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर युवा सेनाप्रमुख विक्रम राठोड याच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटकमधील भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांकडून या घटनेच्या विरोधात कारवाई करण्याऐवजी त्यांनी केलेलं वादग्रस्त विधान सहन करणार नाही.  त्यामुळे कर्नाटक सरकारने याबाबत माफी मागावी अन्यथा कर्नाटकमधून बसेस महाराष्ट्रात येऊ देणार नाही. कर्नाटकातील बसेस राज्यात आल्यास तोडफोड करू असा इशाराही युवा सेनेकडून देण्यात आला आहे.

हिंगोलीत राष्ट्रवादीकडून कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी 
हिंगोलीत आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पूजा करण्यात आली. त्यानंतर, कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्या समाजकंटकाला तत्काळ अटक करावी,  त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

ठाण्यात मनसे आक्रमक
या घटनेच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील मनसे आक्रमक झाली आहे. ठाण्यात मनसेच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पुतळ्याला मनसेच्या वतीने जोडे मारत शाई फासण्यात आली. मनसेचे जनहित विधी विभागचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंदरकरसह मनसे पदाधिकऱ्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच विटंबन केलेल्या लोकांना अटक केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला.

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक 
सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. मात्र, कर्नाटक मध्ये महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. दोषींवर कारवाई करण्याऐवजी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त बेताल वक्तव्य केले. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. 

नवी मुंबई मराठा संघटनांनी केला निषेध
नवी मुंबईतही मराठा संघटनांनी या घटनेचा निषेध केला. अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमींनी वाशीत निषेध आंदोलन केले. यावेळी कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटना वारंवार मराठी द्वेष दाखवत असल्याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. हिंमत असेल तर कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना करणाऱ्या नागरिकाने महाराष्ट्रात येवून दाखवावे त्याला ईंगा दाखवू असेही आव्हान कार्यकर्त्यांनी केले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला.

सासवडमध्ये बोम्मई यांचे पोस्टर जाळले
पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये या घटनेचा निषेध करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने हा निषेध करण्यात आला. सासवडमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धुवून काढण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी शिवाजी महाराज की जय आशा घोषणा देण्यात आल्या. तसेच जे समाजकंटक या दुष्कृत्यांमध्ये सहभागी होते त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मुलंडच्या रेल्वे स्थानकावर घटनेचा निषेध 
आज मुलुंड रेल्वे स्थानकावर या घटनेच्या विरोधात मुलुंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेकही करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलकांनी कर्नाटक सरकारचा  निषेध व्यक्त केला. तसेच भाजपने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

जळगावमध्ये कर्नाटक सरकारविरोधी घोषणाबाजी
जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंगळुरूमध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री व भाजपचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी 
माजी मंत्री गुलाबराव देवकर हेही उपस्थित होते.

दरम्यान, याप्रकणी शिवसेनेचे शिष्टमंडळ आज गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहे. पुणे संपर्क प्रमुख सचिन अहिर,  शहराध्यक्ष संजय मोरे आणि गजानन थरकुडे संध्याकाळी अमित शाह यांची भेट घेणार आहेत. याप्रकणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. अमित शाह यांना याची माहिती समजल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी आमंत्रित केले आहे. अमित शाह यांचे आजचे पुण्यातील दिवसभरातील कार्यक्रम संपल्यानंतर ते भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या घरी रात्री जेवणासाठी जाणार आहेत.  तिथे शिवसेनेचे शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे.  शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्र सरकारला पत्र लिहून कर्नाटकमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, दोषींवर कारवाईची करण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Embed widget