एक्स्प्लोर

जपानी तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी बुलेट ट्रेन कर्मचाऱ्यांना जपानी भाषेचे धडे

हायस्पीड रेल टेक्नॉलॉजी ही जपानी शिन्कसेन ट्रेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अवगत करण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये भाषेच्या व्यवहारासाठी तसेच भाषा अवगत करण्यासाठीची गरज म्हणून हा अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला होता.

 मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून जपानी तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या एकूण 72 कर्मचार्‍यांनी जपानी भाषा अवगत केली आहे.या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी जपानची आर्थिक आणि विविध पायाभूत मदत मिळणार आहे. त्यामुळे जपानी कर्मचाऱ्यांशी भारतीय कर्मचाऱ्यांना व्यावहारिक संवाद साधण्यासाठीचा प्रयत्न म्हणून भारतीय कर्मचाऱ्यांनी जपानी भाषा अवगत केली आहे. द जपान फाऊंडेशनमार्फत विविध प्रकल्प कार्यालयातील कर्मचार्‍यांना जपानी भाषा अवगत शिकल्यानंतर प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. जपानी भाषा आणि संस्कृती प्रशिक्षण कार्यक्रमासाठी हे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे. पाच महिन्याचा हा अभ्यासक्रम आखण्यात आला होता. 72 कर्मचार्‍यांनी हे प्रशिक्षण एनएचआरसीएलच्या मुंबई, बडोदा, पालघर, अहमदाबाद, सुरत आणि दिल्लीतील कॉर्पोरेट ऑफिसमधील पुर्ण केले आहे. हायस्पीड रेल टेक्नॉलॉजी ही जपानी शिन्कसेन ट्रेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अवगत करण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये भाषेच्या व्यवहारासाठी तसेच भाषा अवगत करण्यासाठीची गरज म्हणून हा अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला होता. एनएचआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रमाणपत्राचे वितरीत करण्यात आले. हा संपुर्ण अभ्यासक्रम जपान फाऊंडेशनने हा अभ्यासक्रम तयार करताना जपानी भाषा संभाषणासाठी शिकणे आणि जपानी संस्कृती शिकणे यासारख्या गोष्टींचा यात समावेश केला. गेल्या दीड वर्षांपासून हा अभ्यासक्रम एनएचआऱसीएलमध्ये राबविण्यात येत असून एनएचआरसीएलच्या 140 कर्मचाऱ्यांनी ही भाषा शिकली आहे.      काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये-
  • मुंबई अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल.
  • यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे
  • या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असणार आहेत.
  • मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती ही ती 12 स्टेशन्स
  • ताशी 350 किमी धावण्याची क्षमता
  • अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात
  • बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल. सर्व स्टॉप घेतले तर हे अंतर 2 तास 58 मिनिटांत पार होणार आहे.
  • एकूण 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.
  • सुरक्षा आणि खर्चाच्या दृष्टीनं ही बुलेट ट्रेन एलिव्हेटेड म्हणजे उन्नत मार्गावर करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
  • फक्त मुंबईतले स्टेशन वगळले तर इतर सर्व ट्रॅक हा एलिव्हेटेड असणार आहे.
     बुलेट ट्रेन तिकिटाचे संभाव्य दर
  • मुंबई-अहमदाबाद - 3000 रुपये
  • बीकेसी-ठाणे - 250 रुपये
  • मुंबई-अहमदाबाद (बिजनेस क्लास) - 3000 रुपयांहून अधिक
  • एका बुलेट ट्रेनमध्ये 10 डब्बे असतील. ज्यामध्ये एक बिजेनस क्लास असेल.
  • बुलेट ट्रेन प्रकल्पात 24 ट्रेन्स येणार आहेत. सुरुवातीला एक किंवा दोन बुलेट ट्रेन जपानमधून येतील. तर अन्य ट्रेन जपानच्या सहकार्याने भारतातच बनवण्यात येणार आहेत. दहा डब्यांच्या ट्रेनची आसन व्यवस्था 750 इतकी असेल. तर 16 डब्यांच्या गाडीत 1250 आसनं असतील.
  • 2023 सालापर्यंत 10 डब्यांची गाडी येईल आणि 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील.
      कोणकोणत्या सुविधा
  • उत्तम दर्जाची आसन व्यवस्था
  • महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहं
  • प्रवासी आजारी असल्यास आरामासाठी स्वंतत्र छोटी खोली.
  • डब्यात सीसीटीव्ही, आपत्कालीन इंटरकॉम यंत्रणा
  • स्वयंचलित ट्रेन नियंत्रण यंत्रणा
  • स्वयंचलित ब्रेक यंत्रणा
 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget