एक्स्प्लोर
पुढील 48 तास जगभरात इंटरनेट ठप्प राहण्याची शक्यता
इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाईन्ड नेम्स अँड नंबर्स यादरम्यान क्रिप्टोग्राफिक की बदलून यावेळी मेंटनन्सचं काम करणार आहे.
मुंबई : इंटरनेट वापरणाऱ्यांना पुढील 48 तासांसाठी इंटरनेट नसल्याने अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जगभरात पुढील 48 तासांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. मुख्य डोमेन सर्व्हरचं काही तासांसाठी नियमित देखरेखीचं काम सुरु आहे.
त्यामुळे पुढील काही तासांसाठी इंटरनेट युझरना नेटवर्क फेल होण्याच्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कारण मुख्य डोमेन सर्व्हर आणि त्याच्याशी संबंधित नेटवर्क इन्स्फ्रास्ट्रक्चर काही काळासाठी डाऊन असतील, असं रशिया टूडेच्या वृत्तात म्हटलं आहे.
इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाईन्ड नेम्स अँड नंबर्स यादरम्यान क्रिप्टोग्राफिक की बदलून यावेळी मेंटनन्सचं काम करणार आहे. यामुळे इंटरनेटचं अॅड्रेस बुक किंवा डोमेन नेम सिस्टम (DNS)संरक्षित करण्यात मदत होईल. आयसीएएनएनने म्हटलं की, सायबर हल्ल्याच्या वाढत्या घटना टाळण्यासाठी मेंटनन्सचं हे काम आवश्यक बनलं आहे.
कम्युनिकेशन्स रेगुलेटरी ऑथॉरिटीने (CRA)म्हटलं आहे की, "सुरक्षा, स्थिर आणि लवचिक डीएनएससाठी ग्लोबल इंटरनेट शटडाऊन अतिशय गरजेचं आहे. युझरचे नेटवर्क ऑपरेटर किंवा इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर (ISPs) या बदलासाठी तयार नसतील, तर काही इंटरनेट युझरसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र योग्य सिस्टम सिक्युरिटी एक्स्टेंशन्स एनेबल करुन याच्या प्रभावाकडे दुर्लक्ष करु शकतो."
इंटरनेट युझर्सना पुढील 48 तासांसाठी वेब पेज अॅक्सेस करण्यात किंवा एखादा व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात. यासोबतच युझर आऊटडेटेड ISP चा वापर करत असतील तर ग्लोबल नेटवर्क अॅक्सेस करण्यात अडचणी येऊ शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement