एक्स्प्लोर

मुंबईतील ऑक्सिजनचा तुटवडा कमी न झाल्यास भीषण परिस्थिती निर्माण होईल : डॉ. अमित थाडाणी

गॅस सिलेंडर भरून देण्याचे दर या सर्व व्यवसायिकांनी वाढवले आहेत. जर हे दर वाढत राहिले तर रुग्णांवर उपचार करणं अवघड होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावते, असं आवाहनही डॉ. गाडाणी यांनी केलं.

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाच फायदा उठवण्याचं काम ऑक्सिजन गॅसची निर्मिती करणारे आणि त्याचा पुरवठा करणाऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी जम्बो सिलेंडर केवळ 300 ते 350 रुपयात भरून मिळत होते. आता मात्र यामध्ये वाढ करण्यात आली असून आता हेच दर 750 ते 800 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास रुग्णालयांना ऑक्सिजन कमी पडेल आणि प्रसंगी केवळ ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावल्याच्या घटना समोर येतील हे नक्कीच धक्कादायक असेल, अशी प्रतिक्रिया मुंबईतील प्रसिद्ध निरामय क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर अमित थाडाणी यांनी दिली आहे.

याबाबत बोलताना थाडाणी म्हणाले की, मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी माझ्या खारघर येथील रुग्णालयात एक धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या माझ्या रुग्णालयात जवळपास 25 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेतं आहेत. यातील जे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत त्यांना सध्या इतर रुग्णांच्या तुलनेत जवळपास तिप्पट ऑक्सिजनची गरज लागत आहे. मागील आठवड्यात आम्ही ज्या सिलेंडर पुरवठादाराकडून नेहमी सिलेंडर घेत असतो त्याने अचानक सिलेंडर उपलब्ध नसल्याचं कळवलं. आम्ही सलग दोन दिवस यासाठी विविध ठिकाणाहून सिलेंडर उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु ते होतं नव्हतं. मात्र त्यादिवशी संध्याकाळपर्यंत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाला नसता तर केवळ ऑक्सिजन अभावी रुग्णालयातील रुग्णांवर मृत्यू ओढवू शकला असता. सुदैवाने असा कोणताही प्रकार घडला नाही.

कोरोना रुग्णवाढीचा गैरफायदा घेत ऑक्सिजन पुरवठादारांकडून दरवाढ, ऑल इंडिया ड्रग्ज अँड फूड असोसिएशनकडून निषेध

सध्या आम्ही आमच्या रुग्णालयात राखीव सिलेंडरचा साठा वाढवला आहे. सध्या मुंबईसह उपनगरात अनेक रुग्णालयात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत पाऊल उचलण्यात यावं. सध्या ऑक्सिजन गॅसची निर्मिती करणारे आणि पुरवठादार यांनी अचानक सध्या राज्यात ओढवलेल्या परिस्थितीचा फायदा उठवण्याचं काम केलं आहे. गॅस सिलेंडर भरून देण्याचे दर या सर्व व्यवसायिकांनी वाढवले आहेत. जर हे दर वाढत राहिले तर रुग्णांवर उपचार करणं अवघड होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावते. यासोबत राज्यात जे ऑक्सिजनचे प्लांट आहेत त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. सध्या अशी अनेक रुग्णालय आहेत जे स्वतःचा प्लांट करण्यासाठी तयार आहेत. परंतु त्या प्लांटसाठी होणारा खर्च मोठा आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन डॉक्टरांना प्लांट तयार कारणासाठी सबसिडी दिल्यास, सध्या जी समस्या निर्माण झाली आहे ती कमी होण्यास मदत होईल, असंही डॉ. थाडाणी यांनी म्हटलं.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Samadhan Sarvankar On Shivsena UBT Vishakha Raut: व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
BMC Fellowship Programme: 61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, BMC फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; अवघ्या 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, महापालिका फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Embed widget