श्रीमंत लोकं लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात : राजेश टोपे
कोरोनाची लक्षणं नसताना श्रीमंत लोक ICU बेड वापरत आहेत. श्रीमंत लोकं ICU बेड वर जाऊन बसतात. याबाबत जागरूक राहीलं पाहिजे. ICU बेडवर लक्षणं नसलेल्याना जागा दिली नाही पाहिजे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : कोरोनाची लक्षणं नसताना श्रीमंत लोक ICU बेड वापरत आहेत. श्रीमंत लोकं ICU बेड वर जाऊन बसतात. याबाबत जागरूक राहीलं पाहिजे. ICU बेडवर लक्षणं नसलेल्यानं दिली नाही पाहिजे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. यावेळी ते म्हणाले की ग्रामीण भागात कोरोना पसरत आहे. 80 टक्के लोकांना लक्षण नाहीत. त्यांच्यावर परिस्थितीनुसार उपचार करत आहोत. बरेच जण लक्षणं नसताना बेड अडवून ठेवत आहेत. लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवणाऱ्यांना थांबवावं लागेल, असंही ते म्हणाले.
पांडुरंग रायकर प्रकरणी चौकशी करणार
यावेळी पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनाबाबत बोलताना ते म्हणाले की, या घटनेत अॅब्युलन्स न मिळाले हे दुर्देवी आहे. याचं समर्थन नाही. अशा घटना घडू नये म्हणून आपण नियम बनवलेत. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्हाधिकारी सगळ्यांना सांगितलं आहे की, ही सुविधा मोफत द्या. तरीही अशा घटना घडत आहेत जे दुर्देवी आहे. पांडुरंग रायकर प्रकरणी चौकशी करू तसेच माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ, असंही टोपे म्हणाले.
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनानं निधनटोपे यावेळी म्हणाले की, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष दिले आहे. जम्बो रुग्णालय बनवली आहेत. तिथं अजून व्यवस्था तयार होत आहे. बेडची अडचण येऊ नये म्हणून कडक अंमलबजावणी करत आहोत, असं ते म्हणाले.
यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी टेस्टिंग कमी होत असल्याबाबत केलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की, असं आजिबात नाही. टेस्टिंग आणि ट्रेसिंग वर भर दिला आहे. मोठ्या प्रमाणात ट्रेसिंग करत आहोत. कमी टेस्टिंग करतात त्यांना टेस्ट करण्याबाबत सांगत आहोत. रुग्ण उशिरा हॉस्पिटलमध्ये येतो. हे चुकीचं आणि प्राणघातक आहे. थोडी लक्षण दिसली तर त्वरित उपचार केले पाहिजे, असंही टोपे यांनी सांगितलं.
टोपे यांनी काल दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल 15765 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तर 10978 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 584537 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 198523 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.32% झाले आहे.