एक्स्प्लोर

Harvinder Singh Sandhu: दहशतवादी हरविंदर सिंहच्या हिटलिस्टवर होता महाराष्ट्र, खळबळजनक माहिती समोर

Harvinder Singh Sandhu: आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंह संघु उर्फ रिंदाच्या दहशतवादी मॉड्यूलच्या आधारे हल्ल्याचा कट आखण्यात आल्याचं समोर आलं

Harvinder Singh Sandhu:  मुंबईमध्ये 12 मार्च 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या (mumbai terror attack) आठवणी आजही ताज्या आहेत. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2008 मध्येही मुंबईमध्ये दहशतवादी (mumbai terror attack) हल्ला झाला होता. मुंबईमध्ये झालेल्या दहशतावादी हल्ल्याच्या या घटना आठवल्या तरी आजही भीतीने अंगावर काटा येतो. या हल्ल्यांच्या जखमा आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत. या कटू आठवणी मनातून जात नाहीत. तोवर अशाच एका हल्ल्याचा दहशतवाद्यांनी कट आखला होता. आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंह संघु उर्फ रिंदाच्या दहशतवादी मॉड्यूलच्या आधारे हल्ल्याचा कट आखण्यात आल्याचं समोर आलं. मात्र महाराष्ट्र एटीएस आणि पंजाब अँटी गँगस्टर स्कॉडने या दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडला. आणि तीन संशयित दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. 

कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंह संघु उर्फ रिंदाने महाराष्ट्रात मोठा घातपात करण्याचा कट रचण्यात आला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आलीय. कल्याण येथे पंजाब ॲन्टी गँगस्टर स्क्वॉड आणि महाराष्ट्र एटीएसने केलेल्या संयुक्त कारवाईत तीन अतिरेक्यांना अटक करण्यात आलीय. या तीनही संशयित दहशतवाद्यांच्या कबुलीजबाबातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पंजाबमधील कुख्यात गॅंगस्टर सोनू खत्री अमेरीकेत आहे. तो बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या तसेच दहशतवादी हरविंदर सिंह उर्फ रिंदाचा साथीदार होता. रिंदाचा ड्रग्ज ओव्हरडोसमुळे पाकिस्तानात मृत्यू झाल्यानंतर खत्री यानं त्याचा धंदा आपल्या ताब्यात घेतला. सोनू खत्रीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रात घातपाताचा डाव आखल्याची कबुली या तिघांनी दिली आहे. हल्ल्याच्या सूचना काही दिवसांतच या तिघांना मिळणार होत्या, पण त्याआधीच त्यांच्या हाती बेड्या पडल्या. 

सहा महिन्यात सोनू खत्रीने संशयित आरोपींना पाच ते सहा लाख ट्रान्सफर केले. अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या संपर्कात खत्री असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सीमेपलीकडून मिळणाऱ्या शस्त्रांच्या आधारे खत्री दहशत पसरवतो. महाराष्ट्रात यापुर्वीही अनेकदा दहशतवादी हल्ले झाले आहेत. आता पुन्हा अशाच एका हल्ल्याचा कट आखला जात होता. मात्र हा हल्ला घडवण्यामागे काय उद्देश होता? कोणाच्या सांगण्यावरुन सोनू खत्री महाराष्ट्रावर हल्ला करण्याचा डाव आखत होता?
हे शोधण्याचं मोठं आव्हान तपास यंत्रणांसमोर असणार आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

व्हिडीओ

Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
Embed widget