एक्स्प्लोर

Hasan Mushrif ED Raid : भाजपला पाडायचंय, मुश्रीफला निवडून आणायचंय! ईडीच्या छापेमारीनंतर कागलच्या म्हातारीचा एल्गार

मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर छापेमारी सुरू झाली झाल्याचे समजताच सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी जमण्यास सुरुवात केली. गैबी चौकापासून ते कागलमधील प्रत्येक चौकाचौकात कार्यकर्ते जमण्यास सुरूवात झाली.

Hasan Mushrif ED Raid : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) मातब्बर नेते आणि कागल विधानसभा मतदारसंघातील दिन दलितांचे कैवारी म्हणून ओळख असलेल्या माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने दुसऱ्यांदा कारवाई केल्यानंतर कागल मतदारसंघामधील त्यांच्या समर्थकांमध्ये तसेच मतदारांमध्ये संतापाचा कडेलोट झाला आहे. हे भाजपचे कटकारस्थान असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला. दरम्यान, या कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी त्यांचे कट्टर राजकीय वैरी समरजितसिंह घाटगे यांच्यावर तोफ डागली आहे. चार दिवसापूर्वीच कागलमधील भाजप नेत्याने दिल्लीमध्ये छापेमारी करण्यासाठी वाऱ्या केल्या होत्या असा आरोप मुश्रीफ यांनी केला. अशा पद्धतीने नाऊमेद करून गलिच्छ राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर छापेमारी सुरू झाली झाल्याचे समजताच सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी जमण्यास सुरुवात केली. गैबी चौकापासून ते कागलमधील प्रत्येक चौकाचौकात कार्यकर्ते जमण्यास सुरूवात झाली. यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. यामध्ये एका वृद्ध महिलेने दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. ती म्हातारी म्हणाली की, भाजपला पाडायचंय आणि मुश्रीफला निवडून आणायचंय. मी पेन्शन नेण्यासाठी आलो आहे. कागल मतदारसंघात मुश्रीफ आणि जनतेचे नाते हे सर्वश्रुत आहे. त्यांनी अनेक निराधारांना शासकीय लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मुश्रीफांवर संकटे आली त्यावेळी त्यांचे पाठीराखे नेहमीच धावून आले आहेत.

पहिल्यांदा ईडीने कारवाई केली त्यावेळी सुद्धा कागलमधील महिलांनी विराट असा मोर्चा काढला होता. यानंतर आजही असाच प्रकार दिसून आला. अनेक समर्थक त्यांच्या निवासस्थानासमोर जमण्यास सुरुवात झाली. यावेळी त्यांनी भाजपच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच कागल आणि कोल्हापूर बंदची हाक दिली. त्याचबरोबर काही समर्थकांनी मुंबईत  सोमय्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला.  

मुश्रीफांकडून शांततेचं आवाहन 

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, आज सकाळपासून माझ्या घरावर, माझ्या मुलीच्या घरावर तसेच नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. मी कामानिमित्त बाहेर असल्याने मला दूरध्वनीवरून कारवाईची माहिती समजली. कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी, अशी मी विनंती करत आहे. कागल बंदची हाक देऊ नये, त्यांना तपासात सहकार्य करावे, अशी मी विनंती करत आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य माझ्या कार्यकर्त्यांनी करू नये. 

समरजितसिंह घाटगेंवर टीकास्त्र

दुसरीकडे, हसन मुश्रीफ म्हणाले की, चार दिवसांपूर्वी कागलमधील भाजप नेत्याने दिल्लीला फेऱ्या मारून माझ्यावर कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु ठेवले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना चारच दिवसात ईडीची कारवाई होणार असल्याचे सांगितले होते हे मी जबाबदारीने सांगतो. अशा प्रकारे नाऊमेद करून गलिच्छ राजकारण सुरु आहे. राजकारणात अशा कारवाई होणार असतील, तर त्याचा निषेधच झाला पाहिजे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget