एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद गुजरातीमधून, विरोधक आक्रमक
राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त केलेल्या अभिभाषणाचा अनुवाद आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला.
मुबंई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलेल्या भाषणाचा अनुवाद आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला. त्यामुळे त्यांच्या भाषणादरम्यानच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या प्रकारानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे सतर्क झाले आणि त्यांनी विधानसभेच्या नियंत्रण कक्षात जाऊन स्वत: मराठी अनुवाद केला. पण तोपर्यंत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभात्याग केला. या गोंधळातच राज्यपालांचं भाषण सुरु होतं.
दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विरोधकांनी याप्रकरणी राज्यपालांची भेटही घेतली.
मराठी भाषांतराच्या घोळावर विनोद तावडेंचं स्पष्टीकरण
‘राज्यपालांचं अभिभाषण मराठीत अनुवाद करणारा व्यक्ती भाषांतर कक्षेत नसल्याने मी स्वत: मराठीत भाषांतर केलं. मोघलांना जसे सगळीकडे संताजी-धनाजी दिसत होते तसें काहींना गुजरातीत भाषण ऐकायला आलं असेल. पण या सर्व प्रकाराची चौकशी विधानसभा अध्यक्ष करतील.’ असं तावडे यावेळी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement