एक्स्प्लोर

Goregaon Fire: गोरेगावातील दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी, पण मुख्यमंत्र्यांना भेटू न दिल्याने नागरिक आक्रमक 

Goregaon Fire: गोरेगावात ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पण यावेळी त्यांच्याशी संवाद साधू न दिल्याने नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गोरेगावतील (Goregoan) दुर्घटनास्थळाची पाहणी केली. पण यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटू न दिल्याने नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री पाहणी करुन गेल्यानंतर नागरिकांनी एकच गोंधळ केला. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू न दिल्याने हे नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात यामध्ये जखमी झालेल्यांची भेट घेतली. तसेच त्यांची विचारपूस देखील करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. त्यांनी घटनास्थळाची देखील पाहणी केली. पण यावेळी नागरिक मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 

नागरिक आक्रमक का झाले?

गोरेगावतील ज्या इमारतीमध्ये आग लागली त्या ठिकाणीची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी तिथल्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांशी संवाद साधायचा होता. पण त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ दिली नाही. त्यामुळे नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला. तर जोपर्यंत आमच्याशी इथे येऊन कोणी संवाद साधत नाही, तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही अशी भूमिका या नागरिकांनी घेतली. पण पोलिसांनी त्यांना तुमच्याशी तुमचे स्थानिक प्रतिनिधी येऊन संवाद साधतील असं म्हटलं. पण तरीही हे नागरिक काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचं यावेळी पाहायला मिळालं. 

मुख्यमंत्र्यांनी घेतली जखमींची भेट 

गोरेगावातील इमारीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये अनेकांचा होरपूळ मृत्यू झाला. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जखमींची  कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात  भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच यावेळी त्यांनी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं. पण एसआरएच्या सर्व इमारतींचे ऑडीट होणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीये. 

कुटुंबियांना मदत जाहीर 

दरम्यान गोरेगावात इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून झालीये. तर जखमींच्या उपचारांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पोलिस अधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. स्क्रॅपमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांच्या परिवाराला शासनाकडून पाच लाखांची मदत  करण्यात येणार आहे. जखमींचा उपचाराचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे .

हेही वाचा : 

Goregaon Fire: 'एसआरएच्या इमारतींचे ऑडिट होणार', गोरेगावातील आगीमधील जखमींची मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली भेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
×
Embed widget