एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईकरांसाठी खुशखबर ! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 78 टक्के पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आतापर्यंत 78 टक्के पाणीसाठी जमा झाला असून मुंबईकरांना २४४ दिवस पुरेल इतका हा पाणीसाठा आहे.
मुंबई : मुंबईमध्ये यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली. जून महिन्याच्या शेवटच्या दिवसात सुरू झालेला पाऊस काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा पडत आहे. मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे महिनाभरातच मुंबईला पाणीपुरावठा करणाऱ्या तलावांमध्ये 78.08 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आतापर्यंत एकूण 11 लाख 30 हजार 90 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. मुंबईकरांना 244 दिवस पुरेल इतका हा पाणीसाठा आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवायला 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या तलावांमध्ये असलेला साठा पाहता तीन लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तलाव क्षेत्रात असाच पाऊस पडत राहिल्यास येत्या काही दिवसात मुंबईकरांना लागणारा वर्षभराचा पाणीसाठा तलावात जमा होईल अशी अपेक्षा पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे.
तलावांमध्ये पाणीसाठा -
अप्पर वैतरणामध्ये 56 हजार 410,
मोडक सागरमध्ये 1लाख 28हजार 925,
तानसामध्ये 1 लाख 44 हजार 122,
मध्य वैतरणामध्ये 1 लाख 89 हजार 31,
भातसामध्ये 5 लाख 78 हजार 296,
विहारामध्ये 25 हजार 260,
तुलसीमध्ये 8 हजार 46
हे तलाव झाले ओव्हरफ्लो -
मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव 12 जुलैला, तानसा तलाव 25 जुलैला तर मोडक सागर 26 जुलैला ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला आहे.
राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर, 8 किंवा 9 ऑगस्टनंतर प्रयोग होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement