एक्स्प्लोर
जामीनावर सुटलेल्या आरोपीकडून मुलीचा विनयभंग
याआधीही दीपक मानेच्या विरोधात छेडछाडीचे दोन गुन्हे दाखल असून तो जामिनावर बाहेर आला होता. आता पुन्हा त्याला पोलिसांनी या प्रकरणात गजाआड केले आहे.
मुंबई : जामीनावर सुटलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. दीपक माने असे या नराधमाचे नाव आहे.
मुलुंडच्या स्वप्ननागरी परिसरात एका 16 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीसोबत अश्लील चाळे करत, तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न दीपक मानेने केला.
रात्री अंधाराचा फायदा घेत, दीपक मानेने दुचाकीवरुन मुलीचा पाठलाग केला आणि आपण तुझ्या वडिलांचे मित्र असून, तुला घरापर्यंत सोडतो असे सांगितले. पुढे एका निर्मनुष्य ठिकाणी गाडी बाजूला लावून तिच्यासोबत जबरदस्ती केली.
या मुलीने त्याच्या तावडीतून सुटका करीत पळ काढला. पीडित मुलीने झालेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. तिच्या नातेवाईकांनी याची तक्रार मुलुंड पोलिसांना देताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
याआधीही दीपक मानेच्या विरोधात छेडछाडीचे दोन गुन्हे दाखल असून तो जामिनावर बाहेर आला होता. आता पुन्हा त्याला पोलिसांनी या प्रकरणात गजाआड केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement