एक्स्प्लोर

Ghatkopar Hoarding Falls : मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती

अनधिकृत 120 स्क्वेअर फुटाचे होर्डिंग कोसळून तब्बल 80 हून गाड्या आणि 100 हून अधिकजण अडकल्याची भीती आहे. आतापर्यंत 35 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Ghatkopar Hoarding Falls : मुंबईमध्ये आज दुपारी आलेल्या वादळानंतर झालेल्या अवकाळी पावसाने अवघ्या मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. मुंबईत दुपारी तीन वाजल्यापासून धुळीचे वादळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. सर्वात मोठी दुर्घटना घाटकोपरमध्ये (Ghatkopar Hoarding Falls) घडली.घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपवर महाकाय असे अनधिकृत 120 स्क्वेअर फुटाचे होर्डिंग कोसळून तब्बल 80 हून गाड्या आणि 100 हून अधिकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 35 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तब्बल 120 स्क्वेअर फुटाचे अनधिकृत होर्डिंग

दरम्यान, घाटकोपरमधील घटना ताजी असतानाच वडाळामध्ये सुद्धा पार्किंग टॉवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दोन मोठ्या दुर्घटनांसह मुंबईत इतर ठिकाणी सुद्धा झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अवघ्या तासाभरामध्ये मुंबईत हाहाकार झाला.   मुंबई महापालिकेकडून 40 बाय 40 स्क्वेअर फुट होर्डिंग परवानगी असताना तब्बल 120 स्क्वेअर फुटाचे अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आलं होतं. त्यामुळे ही परवानगी दिली तरी कोणी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या अॅडव्हर्टायझिंग कंपनीला होर्डिंग्ज लावताना वृक्षतोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल सुद्धा दाखल करण्यात आला होता. 

अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित

दरम्यान, घाटकोपर घटनेमध्ये जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली, तरी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार शंभरहून अधिक लोक या ठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. होर्डिंग्ज कोसळल्यानतंर  युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र पेट्रोल पंपाच्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थाचा साठा असल्याने मदतकार्यात अडथळा येत आहे. त्यामुळे गॅस कटरचा पर्याय सावधपणे वापरला जात आहे. महाकाय होल्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आहे ते अनधिकृत असल्याचे समोर आलं आहे. त्या होर्डिंग्जला महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमधील हजारोंनी असलेल्या अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

सायंकाळी साडेचारच्या सुमारास होर्डिंग्ज कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने पोलिसांचे पथक दाखल झाल्यानंतर रुग्णवाहिका सुद्धा तैनात करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत आठ ते दहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. 

वडाळ्यात पार्किंग टाॅवर कोसळला

दरम्यान, घाटकोपरमधील घटना ताजी असतानाच वडाळामध्ये सुद्धा पार्किंग टॉवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना बरकत आली नाका या ठिकाणी श्रीजीवी टॉवर वडाळा पूर्व या ठिकाणी घडली. यामध्ये सुद्धा अनेक गाड्या खाली सापडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका गाडीमध्ये एक मनुष्य होता, अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget