Krishna Mahadik Meet Rinku Rajguru: आर्ची होणारी महाडिकांची सून? रिंकू राजगुरु अन् कृष्णराज महाडिकांचा फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
Krishna Mahadik Meet Rinku Rajguru: कृष्णराज महाडिक हे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव असून महाडिकांचं कोल्हापुरात मोठं प्रस्थ आहे. याच कारणामुळे कृष्णराज महाडिक यांचादेखील कोल्हापुराच्या राजकीय वर्तुळात वावर असतो.

Krishna Mahadik Meet Rinku Rajguru: युट्यूबर (Youtuber) आणि उद्योजक कृष्णराज महाडिक (Krishnaraaj Dhananjay Mahadik) म्हणजे, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे चिरंजीव. कृष्णराज महाडिक सध्या आपल्या समाजकारणामुळे प्रकाशझोतात आले आहेत. क्रिश महाडिक (Krish Mahadik) म्हणून युट्यूबवर ते अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. कधी गावचा रस्ता दुरुस्त करतात, तर कधी चक्क गावात घरोघरी जाऊन कचरा गोळा करताना कृष्णराज महाडिक यांना आपण पाहिलं आहे. युट्यूबवरील त्यांच्या व्हिडीओला अनेकांची पसंती मिळते. त्यांच्या व्हिडीओवर अनेकदा कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊल पडत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच सध्या कृष्णराज महाडिक यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरुन शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. फक्त व्हायरलच नाहीतर, या फोटोमुळे कृष्णराज महाडिक यांच्या लग्नाच्या चर्चांनीदेखील जोर धरला आहे.
कृष्णराज महाडिक यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आहे, सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा. त्यासोबतच एक कॅप्शनही कृष्णराज महाडिक यांनी दिलं आहे. "आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतलं.", असं कॅप्शन कृष्णराज महाडिक यांनी फोटो शेअर करताना दिलं आहे. हा फोटो काही मिनिटातच व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करण्यात आला.
नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. अशातच कामानिमित्त कोल्हापुरात आलेल्या रिंकू राजगुरूनं करवीर निवासिनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. यावेळी तिच्यासोबत राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडीकही होते. दोघांनी एकत्र दर्शन घेतल्यामुळे सध्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, दोघांचा एकत्र फोटो पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. फोटोवर रिंकू आणि कृष्णराज दोघांचेही चाहते भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.
रिंकू राजगुरूसोबत लग्न ठरलं?
कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरूचा एकत्र फोटो पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अनेकांनी तर कमेंट करून थेट दोघांचं अभिनंदन करायला सुरुवात केली आहे. तर, रिंकू राजगुरूसोबत लग्न ठरलंय का? असा थेट प्रश्नही काही चाहत्यांनी कृष्णराज महाडिक यांना विचारला आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरासमोर हा फोटो काढल्यानं दोघांचं ठरलं का? लग्न करण्याचा विचार आहे की काय? मग कधी आणि कसं जुळलं? असे प्रश्न चाहते कमेंट करून विचारत आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रिंकू राजगुरू सोमवारी कोल्हापुरात पार पडलेल्या 'राजर्षी शाहू महोत्सवात' उपस्थित होती. त्यानंतर तिनं कोल्हापुरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. नेमकं त्याचवेळी कृष्णराज महाडिक देवीच्य दर्शनासाठी मंदिरात आले आणि दर्शनावेळी दोघांची भेट घडून आली. कृष्णा महाडिक यांनी रिंकूसोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करताच या चर्चेला उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

