एक्स्प्लोर

घाटकोपरमध्येच सुनिल शितपची आणखी 4 अनधिकृत बांधकामं

घाटकोपर इमारत दुर्घटनेत 17 जणांचा बळी घेणाऱ्या सुनिल शितपचे वेगवेगळे कारनामे आता बाहेर येत आहेत. कोसळलेल्या साईदर्शन इमारतीच्या मुळ ढाच्यात शितपने विनापरवानगी फेरफार केल्याने इमारत कोसळली. मात्र, सुनिल शितपने केलेलं हे एकच आणि पहिलं बेकायदेशिर काम नाही.

मुंबई : घाटकोपरमधील साईदर्शन इमारत दुर्घटनेचा आरोपी सुनिल शितपचे आणखी कारनामे आता बाहेर आले आहेत. कोसळलेल्या साईदर्शन इमारतीच्या मूळ ढाच्यात शितपने विनापरवानगी फेरफार केल्याने इमारत कोसळली. मात्र, सुनिल शितपने केलेलं हे एकच आणि पहिलं बेकायदेशीीर काम नाही. साईदर्शन कोसळली त्याच्या अवघ्या एक ते दीड किमीच्या परिघातच शितपच्या अनधिकृत कारनाम्यांचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी घाटकोपरमधली साईदर्शन इमारत कोसळली, त्याच्या अवघ्या एक ते दीड किमीच्या परिसरातच सुनिल शितपनं चार अनधिकृत बांधकामं केली आहेत आणि आश्चर्य म्हणजे साईदर्शन कोसळेपर्यंत त्यांच्याकडे महापालिकेचं लक्षही नाही. घाटकोपमधील सुनिल शितपची अनधिकृत बांधकामं अल्ताफ नगर झोपडपट्टीला लागुन असेलेले दुमजली बांधकाम जागा – 2100 स्के. फूट कोसळलेल्या साईदर्शन इमारतीपासून अवघ्या 1 किमीच्या परिघात अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर झोपडपट्टीला लागून असेलेले गॅरेज जागा – 200 स्के. फूट कोसळलेल्या साईदर्शन इमारतीपासून अवघ्या 1 किमीच्या परिघात अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरच्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरचे वेअरहाऊससाठी असलेले बांधकाम जागा – 2500 स्के. फूट कोसळलेल्या साईदर्शन इमारतीपासून अवघ्या 700 मीटरच्या परिघात अल्ताफ नगर येथील दोन कॅटरिंग व्यवसायाचे गाळे जागा – 2000 स्के. फूट कोसळलेल्या साईदर्शन इमारतीपासून अवघ्या 1 किमीच्या परिघात या  बांधकामांवर महापालिकेने साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दोन दिवसांनंतर कारवाई केली. साईदर्शन इमारत कोसळल्यानंतर महापालिका यंत्रणांवरचा दबाव वाढला आणि या शितपच्या चार पैकी एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. मात्र, अजूनही शाबुत असणाऱ्या इतर अनधिकृत बांधकामांचं काय, हा प्रश्न कायम आहे. जे बांधकाम पालिकेनं तोडलं, त्याच्या शेजारीच दुमजली अनधिकृत बांधकाम आहे. या दुमजली बांधकामासंदर्भात कोर्टात केस सुरु आहे. तसेच याच दुमजली बांधकामाशेजारी एक गॅरेज आहे. सुनिल शितपने आतापर्यंत घाटकोपरमध्येच वेगवेगळ्या पद्धतीनं जमिनी ताब्यात घेऊन त्यावर अनधिकृत बांधकामं केली आहेत. आश्चर्य म्हणजे महापालिकेनेच मनोरंजन मैदानांसाठी आरक्षित केलेलं मैदानच पालिका अधिकाऱ्यांच्या कृपाशिर्वादानं शितपनं गिळंकृत केलं. घाटकोपरमध्ये शितपनं महापालिकेच्या जागा बळकावल्या आहेत. तर पवईसारख्या मोक्याच्या ठिकाणी म्हाडा आणि शिपिंग कॉर्पोरेशनच्या जागेवर सुनिल शितपनं थेट बार आणि रेस्टॉरंट बांधले आहे. 17 निष्पापांचे बळी घेतल्यानंतर आता सुनिल शितपभोवतीचे फास आवळले जातीलही. मात्र, केवळ एक ते दीड किमीच्या परिघात किंवा पवईतल्या उच्चभ्रु वस्तीच्या जवळ गेली अनेक वर्षे सुनिल शितप राजरोस अनधिकृत इमले बांधत होता, ते नेमक्या कुणाच्या आशिर्वादानं? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. सुनिल शितपची मोडस ऑपरेंडी : मुंबई हे भूमाफियांसाठी कुरण आहे. कारण इथल्या जमिनीला एक तर सोन्याचा भाव आहे. त्यातच सगळी महत्वाची प्रशासकीय यंत्रणा त्यांची मुख्यालये मुंबईतच आहेत. या प्रशासकीय यंत्रणांमधला एक जरी मासा गळाला लावला, तर अशा भूमाफियांना चरायला मुंबईच्या जमिनींची कुरणे मोकळी होतात. मुंबईत मोक्याच्या जमिनी बळकावणारा सुनिल शितप हाही त्यांच्यापैकीच एक. पवईतल्या मोक्याच्या ठिकाणी रुमर्स लाँज हे बार, रेस्टॉरंट उभारताना शितपने जी मोडस ऑपरेंडी वापरली, तिचाच वापर मुंबईतल्या इतर जागा बळकावतानाही झाला. झोपडपट्टीशेजारची किंवा दोन प्रशासकीय यंत्रणांच्या सीमारेषेवरची एखादी दुर्लक्षित जागा हेरायची. त्यावर रातोरात बांधकाम उभारायचे. हे बांधकाम स्वतःच्या नावावर दाखवताना खोटे खरेदी खत सादर करायेच. बरेचदा अस्तित्वातच नसलेल्या व्यक्तीच्या मालकीची जमीन आपण खरेदी केलीय, हे दाखवायचे आणि याच खोट्या सातबाराच्या आधारे न्यायालयात केस उभी करायची. मुंबई महापालिका आणि सुनिल शितप यांच्यात सध्या 6 केसेस कोर्टात सुरु आहेत. मात्र, या केसेस वर्षानुवर्षे पेंडिंग राहाव्यात म्हणून महापालिकाही शितपला अप्रत्यक्ष मदतच करत आली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget