एक्स्प्लोर

टीम इंडियाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचं निधन

भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचं दीर्घ आजारानं आज मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते.

मुंबई : भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या  77 व्या वर्षी वाडेकरांनी अखेरचा श्वास घेतला. अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वात भारताने 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. अजित वाडेकर यांच्या पश्चात पत्नी रेखा वाडेकर, दोन मुलं आणि भाऊ असा परिवार आहे. वाडेकरांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवारी) मुंबईत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांचे भाऊ अशोक वाडेकर यांनी दिली. अजित वाडेकर यांची दोन्ही मुलं सध्या परदेशात आहेत. त्यामुळे ती परतल्यानंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अजित वाडेकर यांचा अल्पपरिचय अजित वाडेकर यांचा जन्म 1 एप्रिल 1941 रोजी मुंबईत झाला. आपल्या मुलाने गणितात शिक्षण घेऊन, इंजिनिअर व्हावं, अशी अजित वाडेकरांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र अजित वाडेकरांनी क्रिकेट हेच आपलं करिअर निवडलं. क्रिकेट कारकीर्द 1958 साली त्यांनी फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये आगमन केलं, त्यानंतर 1966 साली त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी खेळायला सुरुवात केली. 1966 ते 1974 या काळात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळले. 13 डिसेंबर 1966 रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीतून त्यांनी पदार्पण केलं होतं. या पहिल्या सामन्यात त्यांनी आठ धावा केल्या होत्या. तेव्हाच्या वेस्ट इंडिज संघासमोर भारताचा या सामन्यात सहा विकेट्सने पराभव झाला होता. अजित वाडेकर यांनी 37 कसोटी सामन्यांमधील 71 डावांमध्ये 2113 धावा केल्या. 143 ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे. या धावांमध्ये एक शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. तर दोन वन डे सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर 73 धावा असून 67 ही सर्वोच्च खेळी आहे. ‘आक्रमक फलंदाज’ म्हणून वाडेकरांची ओळख होती. अजित वाडेकर त्यांच्या कारकीर्दीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरत. ‘सर्वोत्कृष्ट स्लिप फिल्डर’ म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. परदेशात भारताला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारे कर्णधार म्हणजे अजित वाडेकर. शिवाय भारताचे ते पहिले वन डे कर्णधार होते. कसोटी कारकीर्द - सामने – 37 - धावा – 2113 - शतक – 1 - अर्धशतकं - 14 सन्मान भारत सरकारने अजित वाडेकर यांना 1967 साली क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने अर्थात 'अर्जुन पुरस्कारा'ने गौरवलं, तर 1972 साली 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवलं. अजित वाडेकरांना दिग्गजांकडून आदरांजली राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री) : सुरेश प्रभू (केंद्रीय मंत्री) : क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग : क्रिकेटर इरफान पठाण : क्रिकेटर सुरेश रैना : पंकजा मुंडे (ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र) :

संग्रहित व्हिडीओ : जेव्हा अजित वाडेकर शेवटचे मैदानात उतरले होते...

संग्रहित व्हिडीओ (मे 2016) : माजी क्रिकेटर अजित वाडेकर यांच्या पंचाहत्तरीनिमित्त गौरवसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. तेव्हा वाडेकर यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगितलं होतं. लिटल मास्टर सुनील गावसकरही यावेळी उपस्थित होती. सुनील गावसकरांनी वाडेकरांच्या नेतृत्त्वात क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Leopard Conflict: 'नरभक्षक बिबटे Gujarat च्या Vantara मध्ये पाठवणार', वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा
NCP Crisis: 'भुजबळ साहेबांचा फोटो काढायची हिंमतच कशी झाली?', Supriya Sule यांचा संतप्त सवाल
Vote Jihad : '...एका खानाला Mumbai वर लादायचंय', Ashish Shelar यांचा गंभीर आरोप
Voter List Row: 'निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं', Raj Thackeray यांचा हल्लाबोल
Infra War Room: 'पाच वर्षांची वेळ मागू नका, अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करा', CM Devendra Fadnavis यांचा कंत्राटदारांना इशारा.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
Embed widget