एक्स्प्लोर

देशातल्या पहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाचं पंचवीसावं ब्रेक थ्रू पूर्ण; मुंबईच्या पोटात नेमकं चाललंय काय?

देशातील पहिल्या भुयारी मेट्रोचं काम मुंबईत सुरू आहे. या प्रकल्पाचं पंचवीसावे ब्रेक थ्रू आज पार पडले. या पार्श्वभूमीवर मेट्रो कामाबद्दल घेतलेला आढावा.

मुंबई : देशातल्या पहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाचे पंचवीसावे ब्रेक थ्रू पार पडले. वरळी सायन्स सेंटरपासून दूरदर्शन या अतिशय वर्दळीच्या आणि दाटीवाटीव्या परिसरात 2.07 किलोमीटरच्या टप्प्याचा पहिला ब्रेकथ्रू पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. गेल्या काही वर्षात वरळी कमर्शियल हब बनले आहे. त्यामुळे इथे दररोज येणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातोय. या पॅकेज अंतर्गत महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, अकॅहरी अत्रे चौक व वरळी या स्थानकांचा समावेश आहे. मुंबईच्या पोटात सुरू असलेलं हे काम नेमकं चालतं कसं? ब्रेक थ्रू म्हणजे काय? या सर्वांचा या बातमीत आढावा घेतला आहे. मुंबईच्या उदरात जवळपास 60 ते 70 मीटर खोल हे भुयारीकरणाचं काम सुरू आहे. भुयार खोदणाऱ्या या एका टीबीएमचं वजन साधारण 400 टन आहे. असे 17 अवाढव्य मशीन्स मुंबई मेट्रोसाठी भुयार तयार करतायत. टीबीएम जेव्हा ठरवलेल्या भुयारी मार्गावर खोदकाम पूर्ण करते त्याला ब्रेकथ्रू म्हणतात या टिबीएमची नावं सुद्धा इंटरेस्टिंग आहेत, वैणगंगा, कृष्णा, सूर्या. गेली तीन वर्ष हे काम सुरू आहे. या टीबीएमला 24 सप्टेंबर 2018 रोजी पहिला ब्रेक थ्रू मिळाला होता. याची माहिती तत्कालिन प्रमुख अश्विनी भिडे वेळोवेळी ट्विटरवरुन शेअर करत होत्या. आज वरळीत आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत पंचविसावा ब्रेकथ्रू पूर्ण झाला. आता दररोज 70-75 लाख मुंबईकरांना लोकल ट्रेनने अमानवी पद्धतीने प्रवास करावा लागतो. 1700 क्षमता असलेल्या एका लोकलमध्ये 4500 प्रवाशी प्रवास करतात, साधारण एका स्क्वेअर मीटर जागेत 12 ते 15 प्रवासी कोंबून घेतात. पुढच्या अकरा वर्षात या महानगराची लोकसंख्या साडेतीन कोटीवर जाईल असा अंदाज आहे. त्यामुळेच 12 मेट्रो लाईन्सचं जाळं लोकलवरील हा ताण कमी करेल आणि मुंबईकरांचं जीवन काहीसं सुखकर करेल अशी आशा बाळगली जात आहे. त्याचाच एक भाग मुंबई मेट्रो - 3 ही कुलाबा ते सीप्झ ही मेट्रो. देशातल्या पहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाचं पंचवीसावं ब्रेक थ्रू पूर्ण; मुंबईच्या पोटात नेमकं चाललंय काय? पर्यावरण प्रेमींच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेणार - आदित्य ठाकरे आरे कार शेडबाबत समितीचा अहवाल प्राप्त झाला असला तरी तो बाईंडिंग नाही. मुख्यममत्र्यांकडे अहवाल दाखल झाला आहे. त्यावर अभ्यास आणि विचार करून योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया उद्घाटनानंतर पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांचं काम विरोध आणि मागणी करणं आहे, ते त्यांना करत राहू दे. पर्यावरण प्रेमींच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईन. नाईट लाईफ बंधनकारक नाही. ज्या व्यापाऱ्यांना दुकानं उघडी ठेवायची असतील त्यांनी ठेवावीत, ज्यांना नाही ठेवायची त्यांच्यावर कसलंही बंधन नाही. नाईट लाईफ कायदे आणि नियमानुसारच लागू होणार, असल्याचंही त्यांनी सांगितलं. Mumbai Metro 3 | मेट्रोच्या तिसऱ्या प्रकल्पातील भुयारीकरणाचा 25 वा टप्पा पूर्ण | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
Nalasopara Crime : 'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार
'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Embed widget