एक्स्प्लोर
कमला मिल अग्नितांडव : मोजोसच्या मालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल
मुंबईतल्या कमला मिल अग्नितांडवाची सुरुवात वन अबाव्ह पब नाही तर मोजो ब्रिस्टोमधून झाली. असा अहवाल अग्निशमन विभागानं दिला आहे. यानंतर आता गुन्ह्यामध्ये मोजोसचे संचालक युग पाठक आणि युग तुलीचं नावंही समाविष्ट करण्यात आली आहेत.
मुंबई : मुंबईतल्या कमला मिल अग्नितांडवाची सुरुवात वन अबाव्ह पब नाही तर मोजो ब्रिस्टोमधून झाली. असा अहवाल अग्निशमन विभागानं दिला आहे. यानंतर आता गुन्ह्यामध्ये मोजोसचे संचालक युग पाठक आणि युग तुलीचं नावंही समाविष्ट करण्यात आली आहेत.
मोजोसचे मालक युग पाठक आणि युग तुली यांच्यासोबतच एका मॅनेजरचं नावही आता एफआयआरमध्ये आरोपी म्हणून सामील करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत असून याशिवाय इतर लोकांची नावं समोर आल्यास आरोपी म्हणून त्यांचं नावही एफआयआरमध्ये टाकण्यात येतील.
मोजोसचा संचालक युग पाठक हा पुण्याचे माजी पोलीस आयुक्त के के पाठक यांचा मुलगा आहे. तर युग तुली हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत.
सुरुवातील मोजो बिस्ट्रोमधील पडदे पेटले त्यानंतर ही आग पसरत गेली आणि रुफ टॉपला असलेल्या वन अबव्ह पबलाही या आगीनं वेढलं. त्याची पुष्टी करणारा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर युग पाठक आणि युग तुलीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.आता गुन्हा दाखल झालेल्यांना अटक कधी होणार हे पाहणं महत्वाचं आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
1 Above पबला गुरुवार 29 डिसेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.
संंबंधित बातम्या :
आयुक्त अजॉय मेहतांची नार्को टेस्ट करण्यात यावी : मनसे
कुठल्याही दबावाशिवाय अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा : उद्धव ठाकरे
'मोजोस बिस्ट्रो मधल्या शेगडीमुळेच कमला मिल्स कंपाऊंडमध्ये अग्नितांडव'
कमला मिल घटनेदिवशी माझ्यावर नेत्यांकडून दबाव : बीएमसी आयुक्त
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement