एक्स्प्लोर
प्रेम प्रकरणाच्या संशयातून बापाने मुलीला जाळलं
बापाने त्याच्या 16 वर्षाच्या मुलीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना विरार येथे घडली आहे.
विरार : बापाने त्याच्या 16 वर्षाच्या मुलीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना विरार येथे घडली आहे. 31 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुलगी फोनवर बोलत होती. तिचे कुणासोबत तरी प्रेम प्रकरण सुरु आहे. या संशयावरून बापाने मुलीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. या घटनेत मुलगी 70 टक्के भाजली असून मुबईच्या केईएम रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मोहम्मद मूर्तिजा मन्सूरी असे आरोपी बापाचे नाव असून तो विरार पूर्वेकडील गोपचर पाडा येथील नूर मंजिल या इमारतीत कुटुंबियांसोबत भाड्याच्या घरात राहतो. 31 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता त्याची 16 वर्षांची मुलगी कोणाशी तरी फोनवर बोलत होती, ती फोनवर बोलताना तिच्या वडीलांने पाहिले. मन्सूरी मुलीला म्हणाला, "तू फोनवर बोलू नको, मला आवडत नाही." त्यानंतर त्याने मुलीला विचारले तुला फोन कुणी दिला आहे? असे म्हणून मन्सूरीने मुलीला बेदम मारहाण केली, त्यानंतर तिच्या हातातील फोन आपटून फोडून टाकला आणि तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले.
मुलीच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात मोहम्मद मूर्तिजा मन्सूरीविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मन्सूरीला पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बीड
भारत
Advertisement