(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोंधळून जाऊ नका! देशभरात नवीन वर्षापासून फॉस्टॅग अनिवार्य, मुंबईत मात्र 26 जानेवारीपर्यंत मुभा
1 जानेवारी 2021 पासून टोल नाक्यांवर वाहनांसाठी फास्टॅग (FASTag) अनिवार्य करण्यात येणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांसाठी हा नियम 26 जानेवारीपासून लागू होईल.
मुंबई : नवीन वर्षापासून म्हणजे 1 जानेवारीपासून टोल नाक्यांवर वाहनांसाठी फास्टॅग (FASTag) अनिवार्य करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांसाठी हा नियम 26 जानेवारीपासून लागू होणार आहे.
मुंबईत 26 जानेवारीपर्यंत फास्टॅग (Fastag) अनिवार्य असल्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. 5 पैकी 4 टोलनाक्यांवर सेन्सर लावण्याचं काम पूर्ण झालंय. मुंबईत चारचाकी गाड्यांना फास्टॅगसाठी 26 जानेवारीची डेडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे 26 जानेवारीपासून चार चाकी वाहनांना मुंबईत फास्ट टॅग अनिवार्य असणार आहे. मात्र, हे नियम फक्त राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांसाठी असणार आहे. केंद्र सरकारच्या ताब्यातील रस्त्यांना मात्र 1 जानेवारी 2021 फास्टॅग अनिवार्य असणार आहे.
मुंबईतील 5 पैकी 4 टोलनाक्यांवर सेन्सर लावण्याचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत विना फास्टॅग गाडीला टोला नाका क्रॉस करता येणार नाही. मुंबईतील दहिसर टोलनाका सोडता अन्य चार ठिकाणच्या टोल नाक्यावरील सेन्सर तसंच इतर तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई पुणे एक्स्पप्रेस हायवे आणि वांद्रे वरळी सी लिंक रोडवर फास्टॅग लावले गेले आहेत. सध्या विना फास्टॅगसाठी काही लाईन चालू आहेत. मात्र, त्या काही दिवसांसाठीच चालू असतील. येत्या 26 जानेवारीपासून अनिवार्य फास्टॅगचा नियम लागू करण्यासंबंधी सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
फास्टॅग 2016 पासून सुरु
फास्टॅग 2016 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि चार बँकांनी एकत्रितपणे त्यावर्षी एक लाख टॅग जारी केले. त्यानंतर 2017 मध्ये सात लाख आणि 2018 मध्ये 34 लाख फास्टॅग जारी केले. मंत्रालयाने या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक जानेवारी, 2021 पेक्षा जुन्या वाहनांसाठी किंवा 1 डिसेंबर 2017 पूर्वी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्याची अधिसूचना जारी केली.
केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 नुसार 1 डिसेंबर 2017 पासून नवीन चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय वाहतुकीच्या वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी संबंधित वाहनाचे फास्टॅग आवश्यक आहे. 1 ऑक्टोबर 2019 पासून राष्ट्रीय परवान्यांसह वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन थर्ड पार्टी विमा साठी कायदेशीर फास्टॅग देखील अनिवार्य केले गेले आहे. 1 एप्रिल 2021 पासून ही अंमलात येईल.
संबंधित बातमी :
FASTag | 'या' तारखेपासून वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य, नितीन गडकरी यांची घोषणा
FASTag : देशभरात 1 जानेवारीपासून फॉस्टॅग अनिवार्य, राज्यात मात्र 26 जानेवारीनंतर अंमलबजावणी