(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Exclusive | सचिन वाझे यांना अडकवलं जातंय; वाझे कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया
एनआयएकडून कुटुंबियांशी कोणातही संपर्क साधला जात नाहीये आणि कुठलीही माहिती दिली जात नाही, असं सुधर्म वाझे यांनी सांगितलं.
मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबियांयांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. सचिन वाझे यांची बंधू सुधर्म वाझे यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला आहे. सचिन वाझे यांना या प्रकरणात अडकवण्यात येत आहे. त्यांना अटक झाल्याची माहिती आम्हाला कुणीही दिली नाही. मीडियाच्या माध्यमातून त्यांना अटक झाल्याचं आम्हाला कळालं. सचिन वाझे यांच्या पत्नी यांनाही ही माहिती नव्हती, अशी माहिती सुधर्म वाझे यांनी दिली आहे.
सचिन वाझे आणि सुदर्म वाझे यांची दोन दिवसांपूर्वी मुंबईत भेट झाली होती. त्यावेळ सचिन वाझे प्रचंड तणावात होते. सचिन वाझे यांनी काल जे स्टेटस ठेवलं त्यात त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली, असं सुधर्म वाझे यांनी सांगितलं. ते सक्षम अधिकारी आहेत आणि एनआयएच्या तपासाला ते संपूर्ण सहकार्य करतील, असं सुधर्म वाझे यांनी म्हटलं. या प्रकरणात त्यांना अडकवण्यात आलं आहे. या प्रकरणात काहीही होऊ शकतं, याबाबत सुधर्म वाझे यांनी चिंता व्यक्त केली. एनआयएकडून कुटुंबियांशी कोणातही संपर्क साधला जात नाहीये आणि कुठलीही माहिती दिली जात नाही, असं सुधर्म वाझे यांनी सांगितलं.
सचिन वाझेंनंतर आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता, NIA सूत्रांची माहिती
सचिन वाझेंवर कोणती कलमान्वये कारवाई?
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. NIA ने सचिन वाझे यांच्यावर आयपीसी कलम 286, 465, 473, 506(2), 120 B आणि स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये कलम 286- जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटकं बाळगणे, इतरांच्या जीवाला धोका होईल असं वर्तन करणे, कलम 465 – खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे, कलम 473 – दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती, कलम 506(2) – दहशत निर्माण करणं किंवा धमकी देणे, कलम 120 B – गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्रात सहभाग घेणे, स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब – स्फोटकं बाळगणे याचा समावेश आहे.
Sachin Vaze Arrested : सचिन वाझेंना अटक, आतापर्यंत नेमकं काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?