एक्स्प्लोर
परीक्षा तोंडावर मात्र टॅबमध्ये दहावीचा अभ्यासक्रम लोड नाही
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील 10 वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम त्यांच्या टॅबमध्ये लोड करण्यात आलेला नाही. मुंबई महापालिकेने ज्या मे.टेक्नो इलेट्रोनिक्स कंपनीकडून टॅब खरेदी करण्यात आले आहेत, त्या कंपनीच्या अकाउंटची चौकशी सुरू झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई : 10 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अवघ्या 3 महिन्यांवर आली आहे. तरीही मुंबई महापालिकेच्या शाळांमधील 10 वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम त्यांच्या टॅबमध्ये लोड करण्यात आलेला नाही. मुंबई महापालिकेने ज्या मे.टेक्नो इलेट्रोनिक्स कंपनीकडून टॅब खरेदी करण्यात आले आहेत, त्या कंपनीच्या अकाउंटची चौकशी सुरू झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
मे.टेक्नो इलेट्रोनिक्स कंपनीने एका सब कंपनीला अभ्यासक्रम टॅबमध्ये लोड करण्याचे काम दिले आहे. याबाबतचा प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर आणण्यात आला. त्यावर वर्ष संपायला आले आता 10 वीचे विद्यार्थी अभ्यास कधी करणार? असा सवाल भाजपकडून केला जात आहे.
अभ्यासक्रम लोड करण्याचे काम अकाउंटची चौकशी सुरू असलेल्या कंपनीकडून का करून घेतले जात आहे. पुढे याच कंपनीकडून शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या टॅबचे मेटेनन्स कसे होईल असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान महापालिका प्रशासनाला स्थायी समितीमध्ये सूचना देण्यात आल्या आहेत. अभ्यासक्रम लोड करण्यास प्रशासनामुळे दिरंगाई झाली हे सत्य आहे. मात्र त्याची दखल सत्तापक्ष म्हणून आम्ही घेऊ असे स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement