एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जमीन 5 कोटींची, लाच 30 कोटींची कशी?: एकनाथ खडसे
मुंबई: महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या नावाखाली लाच मागणाऱ्या गजानन पाटीलला अटक केल्यानंतर खडसेंना मात्र त्याची पाठराखण केली आहे. 'जमिनीची किंमत केवळ 5 कोटी असताना कोणी 30 कोटी कसे काय मागू शकतो?' असा सवाल एकनाथ खडसेंनी विचारला आहे. तसेच आरोप करणारे विकृत मनोवृत्तीचं असल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले.
एवढंच नव्हे तर, 'गजानन पाटील हे चांगले सामाजिक कार्य करतात. मी त्यांना ओळखतो. वारकरी असल्यानं आषाढी, कार्तिकीला ते माझ्या सोबत असतात.' असंही खडसेंनी म्हणाले.
काय आहे प्रकरण?
कल्याणमधील इंटरनॅशनल सोसायटी फॉर एक्सलन्स या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने 2004 मध्ये 37 एकर जमीन खरेदी केली होती. मंत्रालयात आग लागल्यानंतर कागदपत्रं जळून खाक झाल्याने संबंधित जमिनीची खरेदी प्रलंबित होती. यानंतर महसूल विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळावं यासाठी संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव पाठपुरावा करत होते. यादरम्यान एकनाथ खडसेंचे ओएसडी उन्मेश महाजन यांनी रमेश जाधव यांची भेट गजानन पाटीलशी घालून दिली. काम करुन देण्याच्या मोबदल्यात गजानन पाटीलने सुरुवातीला एक फ्लॅट आणि एक कोटीची मागणी केली. पाटीलने जाधव यांना चर्चेसाठी खडसेंच्या रामटेक बंगल्यावरही अनेकदा बोलावल्याचं समजतं. हळूहळू त्याची मागणी वाढ गेली आणि जमीन हस्तांतरित करण्यासाठी त्याने तब्बल 30 कोटींची मागणी केली. त्यानंतर रमेश जाधव यांनी लाचलुचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
एसीबीने सापळा रचला. लाच मागितल्याची खात्री पटल्यानंतर गजानन पाटीलवर कलम 154 अंतर्गत सोमवारी 9 मे गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र गुन्हा नोंदवल्याच्या चार दिवसांनी म्हणजे शुक्रवारी मंत्रालयाच्या गार्डन गेटजवळ त्याला अटक केली. गजानन लक्ष्मण पाटील हा मुक्ताईनगरच्या मेळ सागवेचा रहिवासी आहे.
एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण
दरम्यान, “गजानन पाटील नावाची व्यक्ती माझ्या मुंबई किंवा जळगावातील कार्यालयात अधिकृत किंवा खासगीरित्या कोणत्याही पदावर कार्यरत नाही,” असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिलं आहे. तसंच माझ्या नावाचा गैरवापर करत असून दोषींविरोधात कठोर कारवाई करावी,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.
याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, “गजानन पाटील हे मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी आहेत. ते अधूनमधून जळगाव जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत आणतात. तसंच तालुक्यातील रहिवासी असल्याने त्यांच्याशी ओळख आहे.”
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
Advertisement