एक्स्प्लोर
डोंबिवलीत लोकलमध्ये चढण्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण
मारहाण करणारे तरुण नेमके कोण होते? आणि या प्रकरणामागचं सत्य काय? हे समोर येणं गरजेचं बनलं आहे.
डोंबिवली : गाडीत चढताना झालेल्या क्षुल्लक वादातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार गजबजलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारानंतर पोलिस सहकार्य करत नसून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.
डोंबिवलीच्या सागर्ली भागात राहणारा 23 वर्षीय धीरज म्हसकर हा तरुण मंगळवारी सकाळी डोंबिवलीहून ठाण्याला जायला निघाला होता. मात्र गाडीत चढताना धीरजचा एका तरुणाला धक्का लागला. यानंतर तरुणाने इतर 7 ते 8 जणांच्या साथीने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप धीरजने केला. तर पोलिस सहकार्य करत नसल्याचं त्याचं आणि त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे.
यानंतर ब्रीजवरही आपल्याला पुन्हा मारहाण केल्याचा आरोप धीरजने केला. यावेळी त्याने एका तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं, मात्र पोलिसांनी त्यालाही सोडून दिलं. तसंच आपला चुकीचा जबाब घेण्यात आल्याचं धीरजचं म्हणणं आहे,
मात्र पोलिसांनी या सगळ्या प्रकाराबाबत गुन्हा नोंदवला असून कॅमेरासमोर बोलण्यास आणि सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्यासाठी डोंबिवलीत राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे.
मारहाण करणारे तरुण नेमके कोण होते? आणि या प्रकरणामागचं सत्य काय? हे समोर येणं गरजेचं बनलं आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement