हृदयद्रावक! पुरानं गेलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यास गेला, शॉक लागून तरुणाचा मृत्यू, जालन्यात हळहळ
मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने मोठे नुकसान केले आहे.

Jalna : मराठवाड्यासह जालन्यात मागील आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने ठीक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून मोठी पडझडही झाली आहे.दरम्यान, वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने तो पूर्ववत करण्यासाठी आलेल्या तरुणाचा विजेचा जोरदार शॉक लागल्याने मृत्यू झालाय. जालन्यातील भोकरदन तालुक्यातील हिसोडा गावात घटना घडली आहे. मृत तरुणाच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ असा परिवार आहे .
नेमके घडले काय ?
जालन्यातील भोकरदन तालुक्यात मागील आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे .हिसोडा गावात पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे .वीज नसल्यामुळे गावातील नागरिकांचं जीवन ठप्प झाले आहे . दरम्यान ही सोडा गावातील 24 वर्षांचा तरुण गावातील प्रत्येक घराघरात जाऊन नादुरुस्त झालेली विजेची काम करत होता .शुक्रवारी (26 सप्टेंबर ) तो रात्री आठ वाजता विजेचाच काम करण्यासाठी बाहेर पडला .गावाला वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राजवळ येऊन शहानिशा करत असताना त्याला जोराचा विजेचा धक्का बसला .विजेच्या धक्क्याने तरुण जागीच कोसळला .आजूबाजूच्या लोकांनी त्याला रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले होते . विकी राजू साळवे असे मृत तरुणाचे नाव आहे . या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे . घटनेनंतर ही माहिती पारद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना देण्यात आली .त्यानंतर तरुणाच्या मृत्यूची नोंद करत पोलिसांनी पुढील तपास केला . गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या मृत्यूमुळे गावात शोळकळा पसरली आहे .
मराठवाडा पुराने वेढला!
गेल्या आठवड्याभरापासून मराठवाड्यात पावसाने हैदोस घातला आहे .धाराशिव बीड लातूर जिल्हा सह बहुतांश ठिकाणी गावेच्या गावे पूरग्रस्त झाले आहेत .नद्या नाल्यांना पाणी आले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे . अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे .घरांची पडझड जनावरांचे मृत्यू पाण्यात गेलेली शेती घरादारांत साठलेला चिखल या सगळ्यामुळे गावात दुर्गंधी पसरले आहे .पुरामुळे अनेकांना स्थलांतरित करण्यात येत आहे .पुरामुळे भीषण परिस्थिती आहे .
























