एक्स्प्लोर

Kolhapur, Sangli Rain Update: कोल्हापूर, सांगलीत पावसाचे धुमशान; खरीप पिकांचे मोठे नुकसान, छाटणी झालेल्या द्राक्षबागांवर दावण्या व करपा रोग पडण्याची शक्यता

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; मिरज-कुपवाड भागात शाळांना सुट्टी. सततच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान व द्राक्ष बागायतदार चिंतेत.

Kolhapur, Sangli Rain Update: कोल्हापूर शहर जिल्ह्यासह तसेच सांगली जिल्ह्याला (Kolhapur Sangli Rain Update) सुद्धा परतीच्या मान्सून पावसाने काल (26 सप्टेंबर) दुपारपासून झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर शहरात (Kolhapur heavy rain news) अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरु आहे. दुसरीकडे सांगलीत रात्रभर संततधार पाऊस जिल्ह्यात पडला असून सकाळ पासून संततधार सुरूच आहे.  सततच्या या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काल दुपारी सांगली, मिरज, कुपवाड शहरात दिवसभर संततधार पाऊस सुरू झाला आणि आता सलगच्या पावसाने सखल भागामध्ये पाणीच पाणी साचून राहिले. या पावसाने शेतातील कामे ठप्प झाली. पावसामुळे द्राक्षबागांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ऑक्टोबर छाटणीस पावसाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

 

सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना आज सुट्टी (Sangli Miraj Kupwad schools holiday) 

मध्यरात्रीपासून सांगली, मिरज शहरात जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मध्यरात्री सांगली, मिरज शहरात मुसळधार पाऊस पडला. सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाऊस मात्र सुरूच आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना आता प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. शेतामध्ये गुडघाभर पाणी साचून राहिल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यात यावर्षी द्राक्ष बागायतदारांनी (Grapes farmers worried in Sangli rain) लवकर छाटण्या घेतल्या आहेत. परंतु आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने द्राक्ष बागायतदार चिंतेत आलेत. छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांवर दावण्या आणि करपा रोग पडण्याची शक्यता आहे. असाच पाऊस काही दिवस राहिल्यास याचा द्राक्ष बागायतदारांना मात्र मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे याची धास्ती आता द्राक्ष बागायतदारांनी घेतल्याचे दिसून येते.

 

सांगली जिल्ह्यातील 68 पैकी 21 मंडळांमध्ये अतिवृष्टी (Kolhapur Sangli weather update) 

सांगली जिल्ह्यातील 68 पैकी 21 मंडळांमध्ये (Kolhapur Sangli weather update) अतिवृष्टी झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव आणि मिरज तालुक्यातील बेळंकी मंडळात सकाळी आठ वाजेपर्यंत मागील 24 तासात 90.8 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व पाचही म्हणजे ढालगाव, देशिंग, कुणी, हिंगणगाव व कवठेमहांकाळ मंडळात 73.5 ते 90.8 मिलीमीटर पाऊस झाला. अग्रणी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील तासगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तासगाव तालुक्यातील मांजर्डे, विसापूर, येळावी, मणेराजुरी,सावळज आणि वायफळे मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली आहे.

अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागली (Agrani river flood) 

सांगली जिल्ह्यातील खानापूर घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसाने अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागलीय. तसेच  या दमदार पावसाने खानापूर घाटमाथ्यावच्या भागातील तलाव ओवरफ्लो झालेत. तसेच परिसरातील ओढे, नाले, तुडूंब भरून वाहू लागले होते तर रस्त्याना ओढ्याचे स्वरूप आलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election : 'गोकुळ'साठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढणार, भाजप-शिवसेना समसमान जागा
'गोकुळ'साठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढणार, भाजप-शिवसेना समसमान जागा
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Embed widget