एक्स्प्लोर

Satara Rain Update: दुष्काळ पाचवीला पुजलेल्या साताऱ्यातील माण तालुक्यात माणगंगा नदीला पूर! म्हसवडला सुद्धा मुसळधार पावसाचा तडाखा

Satara Rain Update: दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यामध्येही मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे माण तालुक्यात माणगंगा नदीला पूर आला आहे.

Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे म्हसवड शहराला जोरदार फटका बसला आहे. शिंगणापूर रस्त्यालगतच्या भागात पाण्याचा वेढा निर्माण झाला असून रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. अचानक पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

माण तालुक्यामध्येही मुसळधार पाऊस 

दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यामध्येही मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे माण तालुक्यात माणगंगा नदीला पूर आला आहे. म्हसवड येथील माणगंगा नदीने पुराचे पातळी ओलांडली आहे. त्यामुळे म्हसवड नगरपरिषदेकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आलं आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. 

कोयना धरणातून विसर्ग वाढवला

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे 1 फुटांनी उघडून 6400  क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणाचा पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिटमधून 2100 क्युसेक विसर्ग सुरू असून असा एकूण कोयना नदीमध्ये 11,700  क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर धरणातून विसर्ग वाढू शकतो त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सांगली जिल्ह्यातील 68 पैकी 21 मंडळांमध्ये अतिवृष्टी  

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील 68 पैकी 21 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव आणि मिरज तालुक्यातील बेळंकी मंडळात सकाळी आठ वाजेपर्यंत मागील 24 तासात 90.8 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व पाचही म्हणजे ढालगाव, देशिंग, कुणी, हिंगणगाव व कवठेमहांकाळ मंडळात 73.5 ते 90.8 मिलीमीटर पाऊस झाला. अग्रणी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील तासगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तासगाव तालुक्यातील मांजर्डे, विसापूर, येळावी, मणेराजुरी,सावळज आणि वायफळे मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Tukaram Mundhe : हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Embed widget