Disha Salian Case : मुंबई पोलिसांची टीम दिशा सालियनच्या घरी दाखल, चौकशीच्या सुरुवातीलाच कुटुंबियांचा मोठा खुलासा
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक दिशा सालियनच्या घरी पोहचले असल्याची माहिती समोर येतेय.
![Disha Salian Case : मुंबई पोलिसांची टीम दिशा सालियनच्या घरी दाखल, चौकशीच्या सुरुवातीलाच कुटुंबियांचा मोठा खुलासा Disha Salian case A team of Mumbai Police entered her house make a proper inquiry and bring out the truth her family requested detail marathi news Disha Salian Case : मुंबई पोलिसांची टीम दिशा सालियनच्या घरी दाखल, चौकशीच्या सुरुवातीलाच कुटुंबियांचा मोठा खुलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/15/82842a7ed15c1338ea82ed7547c8d1e71702644883493720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : दिशा सालियनच्या (Disha Salian) घरी मुंबई पोलिसांची (Mumbai Police) टीम दाखल झाली आहे. दिशाच्या कुटुंबियांना देखील तिच्या मृत्यूबाबत संशय असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासाठी तिच्या कुटुंबियांनी योग्य चौकशी करुन सत्य समोर आणण्याची विनंती यावेळी पोलिसांना केली आहे. आतापर्यंत दिशा सालियनप्रकरणी तिच्या कुटुंबियांनी नारायण राणे यांच्याकडून जे आरोप होत होते ते खोटे असल्याची भूमिका व्यक्त केली होती. दिशा सालियन प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यांकडून सातत्याने आरोप केले जात आहे.
ज्यावेळी एसआयटी दिशा सालियनच्या घरी पोहचली त्यावेळी त्यांनी मोठा आरोप केल्याचं समोर आलं. तिच्या कुटुंबियांना देखील तिच्या मृ्त्यूबाबत संशय व्यक्त केलाय. आतापर्यंत दिशाने आत्महत्याच केली असल्याचं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं होतं. पण आता सातत्याने जे पुरावे किंवा आरोप करण्यात येत आहेत, त्यामुळे तिच्या कुटुंबियांना देखील संशय निर्माण झाला आहे.
पोलिसांना निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती
त्याच पार्श्वभूमीवर तिच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांना निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केलीये. दरम्यान दिशाने आत्महत्याच केली असल्याचा जबाब तिच्या कुटुंबियांनी दिला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी दिशा सालियनची केस बंद केली होती. पण आता तिच्या कुटुंबियांनी देखील संशय निर्माण केल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
चौकशीच्या सुरुवातीलाच कुटुंबियांचा मोठा खुलासा
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर या प्रकरणात एसआयटी चौकशी स्थापन देखील झाली. पण या एसआयटी चौकशीच्या सुरुवातीलाच कुटुंबियांनी धक्कायदाक खुलासा केलाय. आम्हालाही दिशाच्या मृत्यूबाबत संशय असल्याचं तिच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता हा तपास कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसंनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेदेखील आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला.
हेही वाचा :
पुतण्यावर आरोप, काकी मैदानात, आदित्य असं काही करु शकेल वाटत नाही, शर्मिला ठाकरेंकडून पाठराखण!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)