एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभार कुठे आहे?: धनंजय मुंडे
पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावरुन धनंजय मुंडेंनी आज (गुरुवार) मुख्यमंत्र्यांनाही चिमटे काढले.

फाईल फोटो
मुंबई : एमपी मिल कंपाऊडच्या एसआरएत घोटाळा करणारे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा तातडीनं राजीनामा घ्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केली आहे. मेहता यांनी सभागृहात खोटं निवदेन करुन दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय पारदर्शक कारभार कुठे आहे? असं म्हणत धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांनाही चिमटे काढले. प्रकाश मेहतांवर एसआरएचा घोटाळा आणि मुलाला लाभ मिळवून दिल्याचा आरोप आहे. तर तिकडे 12 हजार हेक्टर जमीन घोटाळा झाला आहे. त्याप्रकरणी देसाईंचाही राजीनामा घ्या अशी मागणीही धनंजय मुंडेंनी केली आहे.
आणखी वाचा























