Devendra Fadnavis Tweet : धडाधड 14 ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धडाधड 14 ट्वीट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धडाधड 14 ट्वीट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवारांकडून जातीय ध्रुवीकरणासाठी विशिष्ट समाजाचं लांगूलचालन केलं जातंय. कलम 370, इशरत जहाँ, या मुद्द्यांचा संदर्भ देत फडणवीसांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे फडणवीसांनी ट्विट्ससोबत पवारांच्या वक्तव्यांच्या लिंक्स जोडून निशाणा साधला आहे.
एकापाठोपाठ एक 14 ट्विट करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. Articl 370 पासून इशरत जहाँ प्रकरणातील वेगवेगळ्या घटनांचा संदर्भ देऊन फडणवीस यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
फडणवीस यांच्या ट्वीटमध्ये काय आहे...
- आज डॉ. आंबेडकर जयंती असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम 370 ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून घेताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं
- काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून अलीकडेच शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांचाही समाचार घेतला
- नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या विधानाचे स्मरण करून दिलं
- इशरत जहाँ ही निर्दोष होती, याबाबत पवारांनी केलेल्या विधानाचेही स्मरण
- एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख
- 2012 मध्ये आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली आणि रझा अकादमीवर कारवाई केली नाही, याचाही उल्लेख
- संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला?
- अल्पसंख्यक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, याही विधानाचे स्मरण
- हिंदू टेरर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, असे विचारत निशाणा
- सच्चर समितीचा अहवाल लागू करण्यासाठी केलेल्या मागणीचाही उल्लेख
- मुंबई बॉम्बस्फोटानंतर 13 वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित
- काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून?
- काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही!
असं म्हणत शरद पवारांवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
Here’s a recent example of what was said by him when his own Minister @nawabmalikncp got arrested for money-laundering linked with the activities of underworld criminal Dawood Ibrahim.https://t.co/xmx1yLzGz3 #AmbedkarJayanti
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 14, 2022