पुणे-नाशिक महामार्गावर खोडद चौकात पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्गाची मागणी, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
या याचिकेची दखल घेत राज्य सरकारला नोटीस बजावत दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई : पुणे-नाशिक महामार्गवर अपघात टाळण्यासाठी खोडद चौकात भुयारी मार्ग बनवण्यात यावा, अशी मागणी करत एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्याची दखल घेत हायकोर्टानं राज्य सरकारला नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावरून दिवसभर मोठ्या प्रमाणात भरघाव वेगानं वाहनांची वाहतूक सुरू असते. या महामार्गावरील नारायण गाव येथील पाटेखैरेमळा-खोडद परिसरात जिल्हा षरिषदेची प्राथमिक तसचे माध्यमिक शाळा आहे. या विद्यार्थांना महामार्ग ओलांडून शाळेत जावे लागत असल्यानं त्यांची गैरसोय होते आणि मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याचा दावा करत सामाजिक कार्यकर्ते नामदेच खैर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्ही.जी.बिश्त यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीनं अॅड. उदय वारूंजीकर यांनी कोर्टाला सांगितलं की, महामार्गालगत गाव असल्यानं छोट्या वाहनांची मोठी वरदळ असते. तसेच हा मार्ग ओलांडताना विद्यांर्थांची तारांबळ होते. त्यामुळे इथं अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या संदर्भात राज्य सरकारकडे भूयारी मार्गाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यावर महामार्गात एक किलोमीटर अंतरावर भुयारी मार्ग दिला जाणार नसल्याचं प्रशासनाकडनं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र अशाप्रकारे अन्य ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. मात्र, सुनावणीदरम्यान सरकारी वकील हजर नसल्यानं हायकोर्टानं राज्य सरकारला नोटीस बजावून दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
हे ही वाचा -
- Mamata Banerjee: ममता बॅनर्जी हाजीर हो! माझगाव दंडाधिकारी कोर्टानं जारी केलं समन्स
- काही लग्नगाठी स्वर्गात नाही तर नरकात बांधल्या जातात, पती-पत्नीच्या कौटुंबिक हिंसाचारावर मुंबई उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
- न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्यांची यापुढे खैर नाही! मुंबई उच्च न्यायालयाचे खडेबोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha