एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकमान्यांचा ऐतिहासिक खटला चालेल्या कोर्टात हळदी कुंकू कार्यक्रम
मुंबई: लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्याविरोधात उच्च न्यायालयातील ज्या ऐतिहासिक कोर्ट रुममध्ये खटला चालला, त्या कोर्ट रुम नंबर 46 मध्ये शनिवारी हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमावेळी हायकोर्टातील महिला वकील तसेच महिला कर्मचाऱ्यांनी बॉलिवूडमधील गाण्यांवर ठेका धरला.
शनिवारी न्यायालयीन कामकाजाला सुट्टी असल्याने कोर्टात सर्वसामान्यांची वर्दळ नव्हती. त्यामुळे हायकोर्टात हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लूर यांच्यासह महिला वकील आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी बॉलिवूडमधील गाण्यांवर ठेका धरुन नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचा आवाज संपूर्ण कोर्टाच्या आवारात जाणावत होता.
लोकमान्य टिळकांनी केसरीतून ब्रिटीश सरकारवर टीका केली होती. त्याची गंभीर दखल घेत ब्रिटीश सरकारने टिळकांविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल केला. हा खटला उच्च न्यायालयातील 46 नंबरच्या कोर्टात चालला. या खटल्याचा निकाल 22 जुलै 1908 रोजी जाहीर झाला. टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली. या निकालावर तुम्हाला काही बोलायचे आहे का? असे न्यायमूर्तींनी टिळकांना विचारले. तेव्हा टिळकांनी, न्यायालयाने मला दोषी ठरवले असले, तरी मानव व देशाचे भवितव्य हाती असलेल्या कोर्टात मी नक्कीच निर्दोष ठरेन, असे ठामपणे सांगितले होते.
टिळकांचा हा दावा या कोर्ट रुमच्या बाहेर संगमरवर दगडावर कोरून ठेवला आहे. या कोर्टात लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांचे मोठे फोटो आहेत. अशा या ऐतिहासिक वारसा असलेल्या कोर्टात शनिवारी महिलांचा हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करुन बॉलिवूडच्या गाण्यावर हायकोर्टाच्या महिलांनी आज ठेका धरल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
मुंबई
करमणूक
Advertisement