एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गेल्या दहा वर्षात मुंबईत बालकांविषयीच्या गुन्ह्यात तब्बल 500 टक्क्यांनी वाढ
'क्राय'ने 3 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांच्या मुलाखती घेऊन हा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार, 2005 मध्ये 1.4 टक्के असलेला दर 2014 मध्ये हा 24 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
मुंबई : गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत मुंबईत बालकांविषयी गुन्ह्यात तब्बल 500 टक्क्यांची वाढ झाली आहे. ‘क्राय’ या सामाजिक संस्थेनं बालकांविषयीचे गुन्हे आणि सुरक्षितता याविषयीचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे.
'क्राय'ने 3 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या पालकांच्या मुलाखती घेऊन हा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार, 2005 मध्ये 1.4 टक्के असलेला दर 2014 मध्ये हा 24 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
याही परिस्थितीत मुंबईतल्या शाळा हे मुंलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण आहे असं मुंबईतल्या 80 टक्के पालकांना वाटतं.
मात्र, अजूनही शाळेची स्वच्छता गृह, स्कूल बस यात मुलं सुरक्षित नाहीत. त्यामुळे यासाठी शासनानं ठोस धोरण राबावावं, अशी मागणी या संस्थनं केलेली आहे. त्याविषयीचा अहवालही सरकारला सादर करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement