Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्येत किंचित वाढ, 56 नव्या रुग्णांची नोंद
Mumbai Corona Update : मुंबईतील आज नव्या 56 रुग्णांची 36 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे.
Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनारुग्णांची(Mumbai Corona Update) संख्या आटोक्यात आली असताना आज मात्र या संख्येत किंचित वाढ झाली आहे. आज 56 नव्या रुग्णांची नोंद झाली असून काल ही संख्या 18 होती. त्यामुळे आज काहीशी वाढ झाल्याने पालिका प्रशासनाला (Mumbai BMC) याबाबत विचार करावा लागणार आहे. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 56 कोरोनाबाधित आढळले असून 36 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 270 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 56 रुग्णांपैकी तीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 151 बेड्सपैकी केवळ 16 बेड सध्या वापरात आहेत.
देशातील रुग्णसंख्येत घट
देशातील कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. देशात सुमारे दोन वर्षांनंतर सलग दुसऱ्या दिवशी एक हजार पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनाबळींच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 795 नवे कोरोनाबाधित आढळले असून 85 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 913 नवीन रुग्ण आणि 13 जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 21 कोटी 416 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
- WHO ची Covaxin च्या पुरवठ्यावर बंदी, जाणून घ्या भारत बायोटेक काय म्हणाले?
- Corona in China : चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढताच, शांघायमध्ये एका दिवसात 8226 रुग्णांची नोंद, जगाची चिंता वाढली
- Coronavirus Cases Today : दिलासादायक! देशात कोरोनाचा आलेख घटताच, गेल्या 24 तासांत 795 नवे रुग्ण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha