(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : दिलासादायक! देशात कोरोनाचा आलेख घटताच, गेल्या 24 तासांत 795 नवे रुग्ण
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत 795 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची सध्याची स्थिती काय आहे.
Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. देशात सुमारे दोन वर्षांनंतर सलग दुसऱ्या दिवशी एक हजार पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनाबळींच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 795 नवे कोरोनाबाधित आढळले असून 85 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 913 नवीन रुग्ण आणि 13 जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 21 कोटी 416 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 12,054 वर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात देशात 1 हजार 208 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 54 झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 416 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 96 हजार 369 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
India reports 795 fresh #COVID19 cases, 1,208 recoveries, and 58 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) April 5, 2022
Active cases: 12,054 (0.03%)
Death toll: 5,21,416
Daily positivity rate: 0.17%
Total vaccination: 1,84,87,33,081 pic.twitter.com/kpduBaiAmX
आतापर्यंत 184 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 184 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत कोरोना लसीचे 184 कोटी 87 लाख 33 हजार 081 डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक कोरोना लस देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Adar Poonawala Coronavirus Update : भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी का झाली? अदार पूनावाला यांनी सांगितले...
- Karauli Violence : खाकीतील माणुसकीचं दर्शन! करौली हिंसाचारादरम्यान कर्तव्यदक्ष पोलिसाचा फोटो व्हायरल, देशभरातून कौतुकाचा वर्षाव
- Karauli Violence : करौलीत दगडफेक, हिंसाचार आणि जाळपोळ, आतापर्यंत 46 जणांना अटक; कर्फ्यू 7 एप्रिलपर्यंत वाढवला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha