Coronavirus | ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 3000 पार, नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेत सर्वाधिक रुग्ण
ठाणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3000 पार पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत ठाणे शहरात तब्बल 83 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर ठाणे जिल्ह्यात एकूण 234 रुग्णांची नोंद करण्यात आली.
मुंबई : ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा यांमध्ये covid-19 रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत ठाणे शहरात तब्बल 83 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर ठाणे जिल्ह्यात एकूण 234 रुग्णांची नोंद करण्यात आली. यासोबतच तेरा रुग्णांनी आपला जीव देखील गमावला आहे. नवीन रुग्णांमुळे ठाणे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 3139 इतकी झाली आहे. तर एकूण मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या 100 वर पोचली आहे.
सर्वात मोठ्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या रुग्णांनी उच्चांक गाठला आहे. एकूण 83 नवीन रुग्ण आज आढळल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. ठाणे शहरातील एकूण रुग्ण संख्या आता 996 की झाली आहे. यासोबत 48 जणांनी आतापर्यंत जीव देखील गमावला आहे. तर आतापर्यंत 273 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी 27 टक्क्यांपर्यंत पोचली आहे. ठाणे शहरात सर्वाधिक रुग्ण हे अनुक्रमे लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्र, वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्र आणि मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये आहेत.
पाहा व्हिडीओ : देशातील प्रसिद्ध देवस्थानांपैकी कोणत्या मंदिराकडे किती सोनं?
दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात देखील covid-19 चा कहर वाढत चालला आहे. ठाणे जिल्ह्याने तीन हजारांचा टप्पा पार केला. त्यामुळे रुग्ण संख्या 3139 वर पोहचली आहे. संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे नवी मुंबई महानगरपालिकेत असून, आतापर्यंत एकूण 1048 रुग्णांची नोंद तिथे झाली आहे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आतापर्यंत 424 रुग्ण, मीरा-भाईंदर महानगरपालिकेत 219 रुग्ण, भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत 38 रुग्ण, उल्हासनगर महानगरपालिकेत 94 रुग्ण, अंबरनाथ येथे बत्तीसतर बदलापूर येथे 79 रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच ठाणे ग्रामीण भागात 137 रुपये आतापर्यंत सापडले आहेत.
ठाण्यातील हा वाढता आकडा धोक्याची घंटा समजली जात आहे. त्यामुळे साज ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय आमदार खासदार नगरसेवक यांची ठाणे शहराबाबत एक बैठक घेतली. त्या बैठकीत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.
संबंधित बातम्या :
धार्मिक स्थळांच्या ट्रस्टमधील सोन्यावरून संघर्ष; पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर पलटवार!
कोरोना संशयिताच्या मृतदेहाला नातेवाईकांकडून अंघोळ, 9 नातेवाईकांना कोरोनाची लागण, 70 जण क्वॉरंटाईन