एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Police | मुंबईत पोलिस आणि कुटुंबियांसाठी हेल्पलाईनसह विविध उपाययोजना
कोरोनाच्या संकटामध्ये आपल्या आणि कोरोनामध्ये पोलीस सुद्धा एक भिंत बनून उभे आहेत. मुंबईमध्ये 400 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
मुंबई : मुंबई पोलीस कोरोना संकटात सुद्धा आपलं कर्तव्य चोख पणे बजावत आहेत. आता मुंबई पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आले आहेत. या हेल्पलाईन नंबरमुळे पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना कोरोना बद्दल फक्त माहीतच मिळणार नाही तर कोरोनाची लागण झाली असेल तर तात्काळ योग्य उपचार मिळण्यास मदत होईल.
कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत 5 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामळे आता अधिक दक्षता घेत मुंबई पोलिसांनसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हेल्पलाईन नंबर 9137777100 सुरु करण्यात आला आहे. ज्यामुळे कोरोना संदर्भात माहिती आणि कोरोना झाल्यास तात्काळ उपचार मिळण्यास मदत होईल.
इतकच नाही तर सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबई पोलिस दलामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईमध्ये 400 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यांचं मनोबल वाढवण्यासाठी झोनल डीसीपी आणि ॲडिशनल सीपी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना भेटत आहेत आणि त्यांचं मनोबल वाढवत आहेत. तर याचा रिपोर्ट रोज संध्याकाळी जॉईंट सीपी ॲडमिन यांना दिला जात आहे. या व्यतिरिक्त कोरोनासाठी बनवण्यात आलेल्या रुग्णालयात मुंबई पोलिसांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रामध्ये 8 तर मुंबईमध्ये आत्तापर्यंत पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना वॉरियर असलेल्या पोलिसांना सुद्धा करण्यापासून सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्र मध्ये कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा हजाराच्या वर गेला आहे त्यात मुंबईमध्ये 400 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाच्या संकटामध्ये आपल्या आणि कोरोनामध्ये पोलीस सुद्धा एक भिंत बनून उभे आहेत. नाकाबंदीमध्ये लोकांच्या संपर्कात येणं, कोरोना ग्रस्त विभागात जाणं, हॉस्पिटलमध्ये ड्यूटी अशा विविध ठिकाणी आणि विविध कारणांसाठी पोलिसांना त्यांचा कर्तव्य बजावावे लागतं. त्यामुळे पोलिसांना कोरोना लागण होण्याची शक्यता अधिकच वाढते.
पोलिसांसाठी शासनाकडून कोरोनापासून वाचवण्यासाठी उपाययोजना
- कोरोना संदर्भात योग्य माहिती मिळावी आणि ज्या पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असेल त्यांना योग्य रुग्णालय आणि उपचार लवकरात लवकर मिळावे म्हणून हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आले आहेत.
- गरज असणाऱ्या वस्तूंची खरेदीचे अधिकार पोलिस कल्याण निधीतून खरेदीचे अधिकार सर्व घटक प्रमुखांना देण्यात आलेले आहेत.
- रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे गोळ्या आणि विटामिन्स या पोलिसांना दिल्या जात आहेत.
- 50 वर्षावरील कर्मचाऱ्यांना जनतेशी थेट संपर्क येणार नाहीत अशी कामे देण्यात यावी तर 55 वर्षावरील पोलिसांना रजा घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
- तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जावी म्हणून फिवर चेकिंग सेंटर उभारण्यात आलेले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement