एक्स्प्लोर

घरबसल्या कोरोनाची लक्षणं ओळखा; विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कोरोनाची घरबसल्या चाचणीची व्यवस्था केली आहे. यासाठी एका संकेतस्थळावरुन स्व-चाचणी सुरू केली आहे. प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होतो.

मुंबई : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे. प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होतो. हे टूल सर्वांसाठी https://covid-19.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून वैद्यकीय सल्ला हवा असेल तर आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्रमांकही या लिंकवर उपलब्ध आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले आहे.

हे स्व-चाचणी टूल मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. कोविड -19 चा प्रभावीपणे सामना करण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता वाढवणे, महत्वपूर्ण माहिती एकत्र करणे तसेच योग्य जनजागृती करून विद्यमान संसर्गाचे अधिक चांगले व्यवस्थापन करणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य हेतू आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि केंद्र व राज्याचा आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करोनासदृश्य लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे विलगीकरण करणे आणि तीव्र लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. पण बऱ्याच नागरिकांमध्ये काही किरकोळ (निम्न) लक्षणे जसे की सर्दी, ताप, खोकला, ज्यांचा कोरोना व्हायरस संसर्गाशी संबंध नसू शकतो, अशा वेळेस नागरिक घाबरून न जाता या टूलच्या आधारे योग्य ती कार्यवाही करू शकतात. अशा बाबतीमध्ये प्राथमिक पातळीवर आपल्या घरीच स्व-चाचणी करता यावी यासाठी महाराष्ट्र शासन व अपोलो 24x7 यांच्या संयुक्त विद्यमाने हे सेल्फ असेसमेंट टूल बनविण्यात आले आले.

Coronavirus | मेड इन इंडिया : पुण्यातील मायलॅब कंपनीत बनणार कोरोना चाचणी किट्स

विशेष बाब म्हणजे, या प्लॅटफॉर्ममुळे प्रशासनाला चाचणी घेतलेल्या नागरिकांचा रिअल टाइम डॅशबोर्डही बघता येतो. तसेच इतर स्व-चाचणी टूल फक्त परिणाम दर्शवितात. मात्र, या टूलने चाचणी केल्यावर एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे ही मध्यम किंवा उच्च स्वरूपाची असल्यास अशा व्यक्तीचे‌ वैयक्तिक तपशील प्रशासनापर्यंत पोहोचवले जातात. यामुळे प्रशासनाला सक्रीय पद्धतीने संभाव्य संक्रमणास अधिक प्रभावीपणे शोधण्याची मदत होईल. हे सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल प्रत्येकाच्या वापरासाठी उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर कोविड 19 रोखण्यासाठी 'काय करावे' आणि 'काय करु नये' (Dos & Don’ts), हेल्पलाइन क्रमांक आणि संबंधित माहिती देखील उपलब्ध आहे. डॉक्टरांकडून दूरध्वनी, व्हिडिओ कॉलद्वारे आरोग्य सेवेचा सल्ला घेण्यासाठीची सुविधाही लवकरच उपलब्ध होईल.

राज्यात कोरोना उपचारासाठी 30 विशेष रुग्णालये घोषीत; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

हा प्लॅटफॉर्म, क्युआर कोड रूपात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि खासगी रुग्णालये येथेही उपलब्ध होणार आहे. जेणेकरुन तिथेही रुग्णांना स्व-चाचणी करता येईल. या नोंदी केल्याने प्रशासनाला सतत अद्ययावत होणारा डॅशबोर्ड पाहता येईल आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेता येतील. या प्लॅटफॉर्मच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी - भारत सरकार, कौशल्य विकास विभागाचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी - महाराष्ट्र शासन, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल, नाशिक महापालिका, डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (टीसीएस फाऊंडेशनचा उपक्रम), कुंभेथॉन इनोवेशन फाऊंडेशन या संस्थांचा महत्त्वाचा सहभाग राहीला. Health Minister on #Corona | कोरोना चाचणीचा अहवाल 5 मिनिटात मिळणार, रॅपीड टेस्टला परवानगी - आरोग्यमंत्री राजेश टोपे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ आणि मोठं नुकसान
Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
Gold Rate : सोने चांदीचे दर उच्चांकावर, सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या

व्हिडीओ

Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ आणि मोठं नुकसान
Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
Gold Rate : सोने चांदीचे दर उच्चांकावर, सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
अकोल्यात भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक; भाजपचे जितेन बरेठिया MIM च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक
अकोल्यात भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक; भाजपचे जितेन बरेठिया MIM च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक
मोठी बातमी! शिवाजी पार्कवरुन आदित्य ठाकरेंनी फोटो दाखवला, फडणवीसांनी कोस्टल रोडचा किस्साच सांगितला
मोठी बातमी! शिवाजी पार्कवरुन आदित्य ठाकरेंनी फोटो दाखवला, फडणवीसांनी कोस्टल रोडचा किस्साच सांगितला
Nashik Bribe: नाशिकमध्ये खाकी वर्दीला डाग लागला, अटकपूर्व जामिनासाठी दोघांनी मागितली दोन लाखांची लाच, गुन्हा दाखल होताच पोलीस पसार
नाशिकमध्ये खाकी वर्दीला डाग लागला, अटकपूर्व जामिनासाठी दोघांनी मागितली दोन लाखांची लाच, गुन्हा दाखल होताच पोलीस पसार
मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी
मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी
Embed widget